सिंधुदुर्गचा सुपुत्र विशाल कडणे यांच्या विशाल कार्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

0
83

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील तळेरे गावचे सुपुत्र मुंबईस्थित विशाल कडणे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहे. स्वतःचे उच्च शिक्षणासाठी ठेवलेले पैसे फुंकून त्यांनी कोव्हीड रुग्नांसाठी मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटरचे वाटप केले. गेल्या २ वर्षात त्यांनी १०० हुन अधिक कोविड रुग्णांना जीवनदान दिले आहे.

त्यांच्या याच निस्वार्थी कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली आहे. दिनांक २१ जून २०२१ रोजी लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे युरोपचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विशाल कडणे यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रमाणपत्र प्रदान करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे विशाल यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेलेला विशाल कडणे हा वयाने सर्वात तरुण असून लंडन येथील विम्ब्लये ब्रेंट महापालिकेचे महापौर भगवान चोहान यांनी स्वतः फोन करून विशालचे अभिनंदन केले.

शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर असलेले विशाल कडणे हे गेले १ वर्ष सातत्याने कोव्हीड रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कमतरता असताना त्यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून दिले.

खडतर परिस्थितीमधून मार्ग काढत असताना विशाल कडणे यांनी मुंबई, सिधुदुर्ग, सातारा, कराड, विटा इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने ह्या मशीन पोहोचवल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स तर्फे दखल घेऊन सन्मान झाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून विशाल यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here