सिंधुदुर्ग – गाळेल येथे डोंगराच्या मातीखाली अडकलेल्या “त्या’ युवकाचा शोध घेण्यास आज दुसर्या दिवशीसुध्दा प्रशासनाला यश आलेले नाही.
मात्र त्या ठीकाणी आज चार पॉकलेनच्या सहाय्याने खोदाई करण्यात आली असून रस्त्याचा एक भाग मिळाल्यामुळे लवकर यश मिळेल,असा विश्वास तहसिलदार राजाराम म्हात्रे व पोलिस निरिक्षक अनिल जाधव यांनी व्यक्त केला.
दरम्यान आज दुसर्या दिवशी त्या ठीकाणी बांद्यातील नागरीकांसह वेगुर्ल्यातील त्या युवकाच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी दोन्ही बाजूने डोंंगराची माती उपसण्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते.मात्र सायंकाळ झाल्यामुळे हे काम पुन्हा थांबविण्यात आले.