केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना नारायण राणे म्हणालेत निवडणूक आयोगाने शिंदे यांना शिवसेना हे नाव आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने दिले त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन. हा निकाल म्हणजे शिवसैनिकांनी एवढी वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जे कष्ट घेतले, घाम गाळला त्यामुळे शिवसैनिकांना मिळालेला हा पुरस्कार आहे असे नारायण राणे यावेळी म्हणालेत.