सिंधुदुर्ग – जिल्हा बँक निवडणुकीत गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोपां मुळे राजकारण तापलेले असताना मतदानासाठी एक तास शिल्लक असताना या निवडणुकीत काही कांगोरे देखील घडले.
कणकवली प्रांताधिकारी कार्यालयाजवळ महा विकास आघाडी आणि भाजप यांचे बूथ समोरासमोर आहेत. आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास शिवसेना नेते संदेश पारकर यांनी भाजपच्या बुथवर कार्यकर्त्यांची भेट घेत त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. त्यामुळे गेले काही दिवस तणावाचे असलेले वातावरण या निमित्ताने मात्र निवळल्याचे पाहायला मिळाले.
भाजपाच्या बुथवर भाजपाचे कार्यकर्ते थांबलेले असताना संदेश पारकर यांनी स्वतःहून बूथ वर जात त्यांच्याशी दिलखुलास चर्चा देखील केली. एकूणच या निवडणुकीच्या ताण तणावाच्या वातावरणात या घटनेची ही चर्चा आहे