सिंधुदुर्ग – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील शिक्षकांनी स्वनिधीतून तब्बल 44 लाखांचा अद्ययावत असा ऑक्सिजन प्लांट आणि 35 बेडचे कोव्हिड सेंटर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उभारले आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधत या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला आमदार वैभव नाईक , संघटनेचे राज्य अध्यक्ष उदय शिंदे , सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नितीन कदम , कणकवली तहसीलदार आर जे पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
उदघाटनानंतर शासकिय रुग्णालयाला हा ऑक्सिजन प्लांट आणि कोरोना वॉर्डचे लोकार्पण करण्यात आले आहे.
पी एस ए पद्धतीचा ह्या ऑक्सिजन प्लांट मधून 333 लिटर प्रति मिनिट इतक्या ऑक्सिजनचा पुरवठा कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला केला जाणार आहे.
याबरोबरच 35 बेडस सह सुसज्ज कोव्हिडं कक्ष देखील याठिकाणी तयार करण्यात आला आहे.
“देशासह राज्यात प्रथमच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून 46 लाख रुपये निधी या साठी गोळा केला गेला ; मात्र मध्यंतरी नैसर्गिक उभारण्यात आला आहे .
या ऑक्सिजन प्लांट मुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालय ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण होणार आहे .
याचा फायदा कोरोना सह इतर सर्व रुग्णांना सुदधा होणार आहे .