राज्यसरकारने सांत आंद्रे मतदारसंघातील न्हावशी इथल्या मरीन प्रकल्प उभारणीला , जो इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत आहे त्याजा हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. आमदार विरेश बोरकर यांच्या मतदारसंघात उभारण्यात येणाऱ्या ह्या प्रकल्पामुळे त्या गावातील मासेमारी तसेच त्या गावातील अस्तित्व धोक्यात येणार आहे. हा गावचा विनाश होऊ नये म्हणून, स्थानिक आमदार विरेश बोरकर हे आपल्या आमदार कनेक्ट ह्या विशेष लोकसंपर्क उपक्रमांद्वारे ह्या विनाशक मरीन प्रकल्पाविरोधात जनजागृती करत आहे.
आज राज्य सरकार गोवेकराना रोजगार देण्यात अपयशी ठरले असताना नको ते प्रकल्प लोकांच्या माथी लावून, त्यांच्या पोटापाण्यावर लाथ मारण्याचे काम हे सरकार करत आहे. आज मासेमारीतून लोक आपला उदरनिर्वाह करत आहे. पण जर असे प्रकल्प गावात आणले तर त्यांचा व्यवसाय बंद होईल. आज राज्य सरकार हे जनमताचा अनादर करून, लोक विरोधात जाऊन, केंद्र सरकारच्या आदेशाने, विनाशक असे प्रकल्प वेगवेगळ्या गावात राबवित आहे. आज आपण सर्वांनी एकजूट होऊन, आपला गाव आपले अस्तित्व राखण्यासाठी हा लढा उभारण्याची गरज असल्याचे आमदार विरेश बोरकर यांनी ह्या आमदार कनेक्ट मार्फत जनजागृती करताना न्हावशि वासियांना सांगितले.