अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तर्फे इन्स्टिट्यूट मिनेजिस ब्रगांचा हॉल पणजी येथे परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य कार्यकर्ता मेळावा सोहळा आयोजित केला होता.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय महामंत्री श्री विनोद तावडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते व अभाविप राष्ट्रीय मंत्री कु. अंकिता पवार यांची उपस्थिती होती. यावेळी संपूर्ण गोव्यातील विद्यार्थी परिषदेचे कार्य केलेले पूर्व कार्यकर्ते तसेच सध्या कार्यरत असलेले अभावीप चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पूर्व कार्यकर्त्यांनी आपल्या काळी परिषदेचे काम करताना घडलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांची आठवण काढली व आपले अनुभव व्यक्त केले.
गोवा प्रमुख श्री विलास सतरकर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. गोवा राज्य संयोजक धनश्री मांद्रेकर हिने गोव्यात मागच्या वर्षी झालेल्या परिषदेच्या कामाची माहिती सांगितली. अभावीप राष्ट्रीय मंत्री कुमारी अंकिता पवार यांनी म्हटले की “विद्यार्थी परिषद हे देशासाठी एक आंदोलन आहे. विद्यार्थी परिषद देशभर अनेक कार्य वर्षभर करत असते.” मुख्य भाषणावेळी बोलताना श्री विनोद तावडे यांनी म्हटले की “विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांमध्ये देशासाठी सतत कार्यरत काम करण्याची भावना निर्माण करणारी संघटना आहे. विद्यार्थी परिषदेतून घडलेला कार्यकर्ता हा आपल्या जीवनात सतत प्रगती करतो. तसेच समाजाला ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मदतीला सतत अग्रेसर असतो. परिषदेचा कार्यकर्ता हा घसघसता धबधबा आहे.”
पणजी महानगर मंत्री वैभव साळगावकर यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवनी शिंदे यांनी केले.