राणे समर्थक आतातरी गोवेकरांचा ठाव ठिकाणा सांगतील काय ?-परशुराम उपरकर

0
308

 

सिंधुदुर्ग – शिवसेनेत प्रवेश केलेले २००५ सालातले राणे समर्थक बेपत्ता रमेश गोवेकरांचा आतातरी ठाव ठिकाणा सांगतील काय ? मनसेचे आ.परशुराम उपरकर यांनी सवाल केला आहे.
रमेश गोवेकर सन २००५ च्या विधानसभेच्या पोटनिवणुकीत बेपत्ता झाले होते. खा.नाराणराव राणेंचे निकटवर्तीय असलेले व सध्या जिल्हा बँकेचे चेअरमन सतीश सावंत , शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले संजय पडते , छोटू ठाकूर , संग्राम प्रभूगांवकर , बाबा आंगणे , बाबा सावंत , बंडू चव्हाण , अरुण लाड आणि नुकताच प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य विकास कुडाळकर आता तरी बेपत्ता रमेश गोवेकरांचे काय झाले? हे जनतेला सांगतील काय ? २००५ च्या निवडणुकीत बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून निष्ठेने काम करणारे भाई गोवेकरांचे बंधू रमेश गोवेकर बेपत्ता झाले,त्याचा आतातरी शिवसेनेची सत्ता असताना या लोकांनी उघड करावे,असा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला आहे.
तेंव्हापासून बाळासाहेब ठाकरे , सध्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शोध घेण्याचा जो प्रयत्न केला त्यास यश आले नाही . याबाबत मी विधानपरिषदेचा आमदार असताना ६ वर्षे प्रत्येक अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन गोवेकर कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला . शिवाय खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन भाई गोवेकरांसमवेत मी स्वतः दिल्ली येथे जाऊन सीबीआयच्या डायरेक्टरांनाही भेटलो होतो . तरीही बेपत्ता झालेल्या रमेश गोवेकरांचा पत्ता लागलेला नाही . मागील ५ वर्षात गृहराज्यमंत्री व सत्ता असूनही शोध लागू शकलेला नाही,तो शोध लावण्याकरितां शिवसेनेत प्रवेश केलेली मंडळी तोंड उघडून माहिती देतील काय ? याची मी बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून वाट पाहत आहे,अशी आठवण परशुराम उपरकर यांनी करुन दिली आहे.
त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत कै.अंकुश राणेंची हत्त्या झाली. त्यावेळी शिवसेनेचे खा.संजय राऊत यांचा हात असल्याचा आरोपही खा.नारायणराव राणेंनी केला होता . त्या अंकुश राणेंच्या हत्त्येची माहिती देतील काय ? तसेच एसएम हायस्कूलच्या कै.मंनचेकर यांची हत्त्या कोणत्या जमीनीच्या वादातून झाली याची माहिती सांगतील काय ? त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कै.बाळा वळंजू यांचा जळून मृत्यु झाला तो मृत्यु , की हत्त्या होती की अपघात होता याचा उलगडा करतील काय ? सध्यःस्थितीत खा.नारायणराव राणे कै.दिशा सानयान व कै.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येबाबत हत्त्या असल्याचे वक्तव्य मिडीयामध्ये करुन मातोश्रीवर बोट दाखवित आहेत . त्या नारायणराव राणेंना धडा शिकविण्यासाठी व शिवसेनेचे सध्याचे निष्ठावंत म्हणून दाखविण्यासाठी तरी ही शिवसेना प्रवेशकर्ती मंडळी आतातरी तोंड उघडून वरीलप्रमाणे बेपत्ता व हत्त्या झालेल्या शिवसैनिकांबाबतची माहिती देऊन धडा शिकवतील काय ? गेली ५ वर्षे सत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे गृहराज्यमंत्रीपद असूनही आ.दिपक केसरकर यांनी या हत्त्यांबाबत ५ वर्षात ब्र सुध्दा काढलेला नाही.ते राज्याचे शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना राणे समर्थक म्हणून त्यावेळी काम करताना ज्या ज्या शिवसैनिकांबाबत राणे समर्थकांनी मारहाणीचे व ईतर प्रकार घडवले त्याचप्रमाणे वरील बेपत्ता झालेल्या कै.रमेश गोवेकर , हत्या झालेले कै.अंकूश राणे , एसएम हायस्कूलचे शिपाई कै.मणचेकर , कै.बाळा वळंजू या लोकांची हत्त्या झाली की काय झाले ? हे सांगून शिवसेनेवरती व शिवसेनेच्या नेत्यांवर तोंडसुख घेणा – या खा.नारायणराव राणेंना धडा शिकवतील काय ? असा सवाल मनसेचे माजी आ . परशुराम उपरकर यांनी केला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here