राठोडने नौटंकी बंद करावी, राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी साधला निशाणा

0
166

 

सिंधुदुर्ग – राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड हे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेले असताना ते आज पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले. त्यांनी आज पोहरादेवी गडावर जावून दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या शेकडो समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्याच मुद्द्यावरुन फायरब्रॅंड नेते आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राठोडने नौटंकी बंद करावी, राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असे त्यांनी म्हटले आहे.

समाजाचे कार्ड वापरून राठोड बाहेर पडले

संजय राठोड पंधरा दिवसांनंतर बिळाच्या बाहेर आले. त्यांनी जे आरोप फेटाळले ते कोण आहेत आरोप फेटाळणारे? स्वतः त्यांची कुठली एजन्सी आहे का? स्वतः CBI आहेत का? स्वतः सांगतायत निर्दोष आहेत म्हणून. पोलीस ठरवतील की, तुम्ही निर्दोष आहात की नाही. तुम्हाला ठरवायचं अधिकार नाही. तुम्ही आरोपी आहात. आरोपी असून सुद्धा राठोड पंधरा दिवस कुठं होते माहीत नाही. तुम्ही शुद्ध होतात मग लपलात का? असा सवाल राणे यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, कशासाठी लपले होते? पुरावे नष्ट करायला का? आता पुरावे नष्ट झाले. म्हणून समाजाचे कार्ड वापरून राठोड बाहेर पडले मात्र ते योग्य नाही. असे राणे यांनी सांगितले.

राज्य सरकारवर निलेश राणे यांचा निशाणा

संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा आजही आमची हीच मागणी आहे. तसेच चौकशीला सामोरे जा. जर हेच सामान्य कुठल्या माणसावर हा प्रसंग झाला असता तर काय केलं असत? संजय राठोड मंत्री आहेत म्हणून महाराष्ट्रात त्यांना वेगळा नियम आहे का? ह्या आधी पण हेच झालं, एका इंजिनिअरला मारहाण झाली मात्र जितेंद्र आव्हाड वर FIR दाखल झाला नाही. तसेच धनंजय मुंडे प्रकरण पण दाबलं गेलं. अशी जोरदार टीका राणे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत

राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही. त्यांच्यावर जर राजरोसपणे मंत्रीचं जर अत्याचार करायला लागले तर, महाराष्ट्राच होणार काय? सामान्य माणसाच होणार काय? हा महाराष्ट्राला मोठा प्रश्न पडला आहे. संजय राठोड यांनी नौटंकी बंद करावी. तिची हत्या की आत्महत्या होती? पूजा चव्हाण देखील बंजारा समाजाची होती. तिला न्याय नको का? म्हणून संजय राठोड पुरावे हेराफेरी करण्यासाठी लपले होते. मात्र राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावें हीच आमची मागणी आहे असे राणे यांनी शेवटी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here