रत्नागिरीत कोरोनाचा संशयित रुग्ण,कोकणात खळबळ

0
268

 

रत्नागिरी मध्ये कोरोना चा संशयास्पद रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रमोद आत्माराम शिंदे असे या रुग्णचे नाव असून ते 58 वर्षाचे आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील कोरोना साठी केलेल्या खास कक्षात त्यांना ठेवण्यात आले आहे.

नाक, घशाला सूज असून त्यांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात येणार आहेत. ते दम्याचे रुग्ण असून 14 दिवसांपासून ते आजारी आहेत. तसेच ते दिल्लीसह काही भागात फिरून आल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here