मोठी बातमी :देवगड समुद्रात सहाजण बुडाले, चार जणांचा मृत्यू तर एकाचा शोध सुरू एकावर रुग्णालयात उपचार सुरू

0
274

 

सिंधुदुर्ग : देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले सहा पर्यटक बुडाले असून चार जणांचे मृतदेह मिळाले तर एकावर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. विद्यार्थी समुद्रात आंघोळीसाठी गेलेले होते. पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे सहा विद्यार्थी बुडाले होते.त्यात चार मुली आणि एक मुलाचा समावेश आहे.त्यापैकी चौघा मुलींचे आणि एक मुलगा मृतदेह सापडले असून एक विद्यार्थी बुडाला असून त्याचा शोध सुरू आहे .एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दुपारी तीन ते चार वाजण्याच्या सुमारासची घटना घडली आहे.हे विद्यार्थी पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती.समुद्रात आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने सहाजण बुडाले.सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर तर एका एकाच शोध घेतला जात आहे.आणि एका विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे .

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन दृष्ट्या मागास असलेला देवगड तालुका सध्या पर्यटनाच्या माध्यमातून कात टाकताना पाहायला मिळतोय. देवगड मध्ये पवन चक्की गार्डनमुळे देवगडला एक वेगळे रूप प्राप्त झाला आहे जिल्हा बाहेरून जिल्ह्यातील अनेक पर्यटक या भागामध्ये दर दिवशी मोठ्या प्रमाणावर भेट देत असतात.त्यामुळे देवगड मधील समुद्रकिनारी सुद्धा पर्यटकांनी भरू लागले आहेत देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याकडे सुद्धा पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढू लागला आहे.परंतु कोकणातील तारकर्ली, देवबाग या भागाचा पर्यटनदृष्या जेवढा विकास झाला तेवढा विकास देवगड तालुक्याचा झालेला नाही.

मात्र देवगड तालुका हळूहळू पर्यटन दृष्ट्या कात टाकत असतानाच अति उत्साही पर्यटकांमुळे देवगड बीच किनारे बदनाम होऊ लागले आहेत. मालवण ,तारकर्ली, देवबाग या परिसरामध्ये अति उत्साही पर्यटकांमुळे अनेकांना आपला बुडून जीव गमवावा लागत आहे. त्यातच आता नव्याने देवगड समुद्रकिनाऱ्याची देखील भर पडली आहे. अशा या समुद्रकिनाऱ्यांवरती सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ठोस उपाय योजना करण्याचे गरज आहे. परंतु तसं पोलीस प्रशासनाकडून कोणतेही उपायोजना समुद्रकिनाऱ्यावर आढळून येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here