मुंबई गोवा महामार्गावर मिडलकटमुळे भीषण अपघात… नेक्झोन कार व दुचाकी अपघात मोटरसायकल स्वाराचा मृत्यू पाहुण्यांकडून माघारी फिरताना झाला अपघात..

0
433

 

 

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या पाच वर्षापासून 95 टक्के पूर्ण झाले असून महामार्गावर अनेक ठिकाणी मिडलकट ठेवल्यामुळे अनेक वाहन चालकांना जीवाला मुखाव लागला आहे. नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार मिडलकट ठेवले गेल्याचे हायवे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांचा जीव या मिडलकटमुळे अपघातात गेलेला पाहायला मिळत आहे.

मुंबई – गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिमवाडी येथे असलेल्या मिडलकटमुळे काल सायंकाळी ३. ३० वा. च्या सुमारास दुचाकी व नेक्झोन कार यांच्यात अपघात झाला. गोव्याहून पुणे येथे जाताना टाटा नेक्झोनची धडक बसून हा अपघात झाला. अपघातामधील जखमी दुचाकीस्वार धर्मराज केशव राणे (रा. टेंबवली – देवगड) यांच्यावर उपचार सुरू असतानाच निधन झाले.

गोव्याहून पुण्याच्या दिशेने टाटा नेक्झोन कार जात असताना कणकवलीवरून देवगडकडे जाणारे दुचाकीस्वार धर्मराज केशव राणे हे नांदगाव ओटव फाटा ब्रीजजवळील मिडलकटवर आले असता मोटारसायकलची कारला धडक बसली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाले होते. दरम्यान त्यांना नांदगाव येथील नरेंद्र महाराज रूग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, जखमी श्री. राणे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. राणे हे दिवाळीनिमित्त नांदगावातील पाहुण्यांकडे गेले असता ते पुन्हा माघारी फिरत असताना हा अपघात घडला आहे.या अपघाताला सर्वस्वी हायवे प्राधिकरण आणि केसीसी कंपनी जबाबदार आहे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.खारेपाटण ते कणकवलीपर्यंत असलेले सर्व अनधिकृत मिडलकट तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here