मी यापुढे राजकीय निवडणूक लढवणार नाही – सुरेश प्रभू माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची व्यापारी एकता मेळाव्यात घोषणा

0
142

 

सिंधुदुर्ग – मी यापुढील काळात निवडणूक लढवणार नाही. राजकीय पक्ष विरहित काम करणार अशी राजकीय घोषणा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापरी एकता मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. ते ऑनलाइन बोलत होते. श्री.सुरेश प्रभू म्हणाले,गावात जत्रा असते तेव्हा आजूबाजूला गावातील लोक येत असतात. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात दुकाने बंद ठेवून व्यापारी सहभागी होत आहेत. बकोरोना महामारीमुळे व्यापारी अडचणीत होता. गावातील जुनी मंदिरे पाहिल्यानंतर गावची विशालता किती होती, हे आजही दिसून येते.

कोकण व्यापारात व शिक्षणात पुढारलेले आहे. कोकणातील माणसे मागासलेली कधीच नाही. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. कोकणी माणसं जगातील सर्वात जास्त नावाजलेली आहेत.माझा तुमच्यामुळे राजकीय जन्म झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कसा होईल,त्याचा आराखडा होता.हुशार मानसाशिवाय विकास नाही. मी निवडून येण्यापेक्षा दंडवते यांचा पराभव झाला यांचे दुःख वाटते. कोकणात पर्यटन वाढले तरच व्यापार वाढेल असा विश्वास ऑनलाईन पद्धतीने व्यापारी मेळाव्यात बोलताना माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू व्यक्त केली.

पायाभूत सुविधा असतील तर कोकणी माणसाचा विकास होईल. पर्यटन क्षेत्रात विकास झाल्यास तरुणांच्या हाताला काम मिळेल. सिंधुदुर्ग रत्नागिरी विजेच्या सुविधेसाठी काम केलं. हवामान बदलाचा परिणाम वाढू लागला आहे. शेती, पर्यटन,व्यापारी एक चैन आहे.व्यापार हा महत्वाचा भाग आहे. त्याच्या वाढी साठी सर्वांनी काम केलं पाहिजे. मी यापुढील काळात निवडणूक लढवणार नाही. राजकीय पक्ष विरहित काम करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तुमचे आमचे संबंध हे राजकीय विरहित आहेत,असे सुरेश प्रभू यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here