मालिकांनी कशाला सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा सरकारवर निशाणा

0
343

 

सिंधुदुर्ग – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपा करीत असताना आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महा विकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये घेणाऱ्या सरकारनेच राजीनामा दिला पाहिजे. हिंदुत्ववादी विचाराच्या बाळासाहेबांचा पक्ष सत्तेसाठी लाचार झाला आहे. मलिक यांच्या समर्थनासाठी उपोषण करणाऱ्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक झाली पाहीजे, असेही राणे यावेळी म्हणाले आहेत.

यानंतर आज सिंधुदुर्गात बोलताना नारायण राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. देशद्रोही मंत्र्याला कॅबिनेटमध्ये स्थान दिले आणि त्याही राष्ट्रवादीच्या, आता त्याच्या समर्थनार्थ सर्वच जण बोलत आहेत. नवाब मलिक यांच्या बद्दल बोलायला कुणालाच अगदी मुख्यमंत्र्यांना देखील नैतिक अधिकार नाही. कडवट हिंदुत्ववादी बाळासाहेबांचा पक्ष आज लाचारीने वागतो आहे. पदासाठी देशद्रोही लोकांचा समर्थन करतो आहे. यासारखी वाईट गोष्ट कोणती आणि समर्थनासाठी उपोषणाला देखील बसतात या उपोषणाला बसणाऱ्या लोकांना देखील देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक झाली पाहीजे असेही यावेळी राणे म्हणाले.

राज्यात शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत. 145 लागतात सत्ता स्थापन करण्यासाठी. सत्तेसाठी लाचारी पत्करून यांनी हिंदुत्वाचा त्याग केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले आहेत. पुढच्या वेळी पाच देखील येणार नाहीत असेही राणे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here