सिंधुदुर्ग – भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला चितपट करत पाकिस्तान पासुन बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना १६ डिसेंबर रोजीचे घडली होती त्याला पन्नास वर्ष पुर्ण झाली आहेत त्याचे औत्सुक्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या ४१ सदस्यांनी तारकर्ली – मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने समुद्रामध्ये सुमारे ३२१ फूट तिरंगा ध्वज फडकाऊन भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळा वेगळा सलाम करून समुद्रामध्ये विजय दिवस साजरा केला.
भारत माता कि जयचा नारा
समुद्रातील पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा 321फुट लांब एवढा मोठा ध्वज फडकविण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषाने तारकर्ली – मालवणचा समुद्र किनारा दणाणून गेला होता. जिल्हावासीयांनी देखील या क्षणाचे साक्षीदार होता आल्याने आनंद व्यक्त केला आहे.
एव्हरेस्टवीर प्राजीत पररेशी यांची होती संकल्पना
भारतीय सैन्याने १६ डिसेंबर १९७१ रोजी पाकीस्तानमधील पुर्वी पाकिस्तान असलेल्या आताच्या बांग्लादेशला स्वांतत्र्य मिळऊन दिले होते. त्यावेळी पासुन 16 डिसेंबर रोजी दरवर्षी देशामध्ये विजय दिवस साजरा केला जातो. याचे औत्सुक्य साधुन लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य एव्हरेस्टवीर प्राजीत पररेशी यांच्या संकल्पनेतुन डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा आणि सर्वाना भारावून टाकणारा उपक्रम घेण्यात आला.
सिंधुदुर्गच्या समुद्रात फडकला तिरंगा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तारकर्ली तालुका मालवण येथील समुद्रामध्ये ३२१ फुट तिरंगा ध्वज फडकाऊन भारतीय सैन्य दलाला आगळा वेगळा सलाम देण्यात आला. यावेळी बोलताना एव्हरेस्टवीर प्राजीत पररेशी म्हणाले. हा सलामीचा उपक्रम आम्ही यशस्वी केला आहे. आता पीओके भारताने ताब्यात घ्यावा हि आमची इच्छा असून. तो विजय दिवस अशाच पद्धतीने आम्ही साजरा करू असे ते म्हणाले.