सिंधुदुर्ग – महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्यावतीने दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी कार्यकारी अभियंता कुडाळ यांच्या कणकवलीतील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. मात्र या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. दरम्यान लेखी आश्वासनाप्रमाणे कार्यकारी अभियंता, रत्नागिरी चर्चेला आलेले नाहीत. उलट त्यांच्यासोबत झालेल्या व्हीडीवो कलिंग चर्चेत त्यांनी आपल्याला उद्धट उत्तरे दिली, त्यामुळे मनसे २८ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा आंदोलन करणार आहे अशी माहिती मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली आहे. तसे पत्रही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांना मुंबईतील कार्यालयाला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान या पात्रात माजी आमदार माजी आमदार परशुराम उपरकर यांनी असे म्हटले आहे कि, दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या रस्त्यांना पडणारे खड्डे खरेदी करुन ठेवलेल्या पावसाळी डांबराने भरण्याबाबत ज्या कामांचे २ वर्षे व ५ वर्षे दायित्व आहे. त्या कामांचे ठेकेदाराकडुन खड्डे भरुन दुरुस्ती करुन घेणे, ज्या कामांचे यावर्षी पावसापूर्वी केलेल्या रस्त्यांचे बी.एम.वॉशआऊट झाले. अशा अनेक कामांबाबत वारंवार चर्चा आणि निवेदने देवुनही कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करुनही दुर्लक्ष केल्यामुळे अधिक्षक अभियंत्यांशी जनतेची रस्त्यांबाबतची कैफीयत मांडण्याकरीता बोलवणे केले होते. मूळ निवेदनात अधिक्षक अभियंता, रत्नागिरी चर्चेला येत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे लिहिले होते. दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी आंदोलन सुरु केल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयातुन दुपारी ४ वाजता जावक क्र.३२/२, दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजीचे पत्र दिले. त्या पत्रात वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा करुन त्यांच्यानुसार चर्चेसाठी आपणास आगावू ४ दिवस अगोदर ज्ञात करण्यात येईल तरी आंदोलन स्थगीत करा, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कणकवली तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांना लेखी पत्र देवुन आंदोलन स्थगीत करण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन स्थगीत केले.
स्थगीत केलेल्या आंदोलनाबाबत १० दिवस होवुनही अधिक्षक अभियंता यांनी तारीख न दिल्याने दि.२१ सप्टेंबर २०२० रोजी कार्यकारी अभियंता यांच्या कणकवली कार्यालयात मी स्वतः व काही पदाधिकार्यांना घेवुन अधिक्षक अभियंता यांच्या वेळेबाबत विचारणा केली असता त्यांनी व्हीडिओ कॉलवर अधिक्षक अभियंतांशी बोलण्यास दिले. त्यावेळी अधिक्षक अभियंतांनी उद्धट उत्तरे देवुन रत्नागिरी येथे चर्चा करण्यास येण्यास सांगितले. मुळात हे आंदोलन सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग यांनी कणकवली येथे केले होते. त्यामुळे निवेदनात अधिक्षक अभियंता यांना चर्चा करण्यास कणकवली येथे येण्याबाबत २८ ऑगस्ट २०२० च्या मुळ निवेदनात म्हटले होते. निवेदनाला २५ दिवस उलटुनही व आंदोलनाला १५ दिवस उलटुनही अधिक्षक अभियंत्यांचे पत्र किंवा भेटीचा निरोप न आल्याने निवेदनाच्या तारखेपासुन एक महीन्याने म्हणजेच २८ सप्टेंबर २०२० रोजी अधिक्षक अभियंता चर्चेला येईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचे ठरविले आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी आपल्या विभागाकडे राहणार आहे. असेही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे.