सिंधुदुर्ग : कोकणातला शेतकरी प्रयोगशील शेती करायला फारसा धाडस करत नाही.कारण त्याला पुरेसे मार्गदर्शन आणि नियोजन अभावी मागे राहतो. मात्र एवढंच नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांकडे
प्रगल्भ इच्छाशक्ती सुध्दा असणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोकणात सरासपणे आंबा, काजू अशी हंगामी पिकं घेतली जातात. त्यामुळे कोकणातला शेतकरी प्रयोगशील शेतीकडे फारसा वळत नाही.त्यामुळे कोकणातला शेतकरी भीती अभावी शेती व्यवसायात मागे राहिलाय.
सिंधुदुर्गातल्या वैभववाडी तालुक्यातील नापणे या गावातील शेतकरी रवींद्र गावडे या शेतकऱ्याने बीएससी ऍग्री झालेली आपली पत्नी गौरी गावडे हिच्या मार्गदर्शनाखाली 6 एकर जागेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला या गावडे कुटुंबीयांनी केला आहे. जवळपास हा भाजीपाला हे गावडे कुटुंबीय गेले दहा ते पंधरा वर्षापासून करत आहेत. 6 एकर जागेच्या क्षेत्रामध्ये पारंपारिक पद्धतीने 4 एकर जागेमध्ये त्यांनी भात शेतीची लागवड केली आहे तर 2 एकर क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला त्यांनी केला आहे. आतापर्यंत 2 एकर क्षेत्रामध्ये त्यांनी पडवळ, दोडके, कारर्ली ,दुधी भोपळा, भोपळा, आवळा , वाल,चिबुड, काकडी,अशा नऊ प्रकारची भाजीपाला केला आहे. आणि त्याला मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे.
सुरुवातीला एक महिना आधी जमिनीची मशागत करावी लागते ,त्यानंतर सरी पाडून आणि वेगवेगळे गादी वाफे तयार करून वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची बी रुपात लागवड करावी लागते.1 एकर क्षेत्राला जवळपास मजुरांनपासून दीड लाख रुपये खर्च येतो.आणि केलेल्या या खर्चापेक्षा दुपटीने खर्च मिळतो.1 एकरचा खर्च वजा करून दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळतो.त्यापेक्षाही चांगला बाजार भाव आणि स्थानिक व्यापाऱ्याने दर दिला तर 4 लाख पर्यत जाऊ शकतो असा विश्वास गावडे यांनी सांगितलाय.या भाजीपाल्यातून सर्व इतर खर्च वजा करून निव्वळ 3 लाख रुपये नफा मिळतोय असं गावडे यांनी सांगितले.
या भाजीपाल्याला मागणी लोकल मार्केटमध्ये आहेतच,परंतु बरीच वर्षे भाजीपाला करत असल्यामुळे काही व्यापारी जाग्यावरून घेऊन जातात तर या भाजीपाल्याला मागणी रत्नागिरी, गोवा असं मार्केट उपलब्ध आहे.तोटा आणि फायदाच गणित न घालता काही वेळा व्यापाऱ्यांना एकचं दर 25 ते 30 रुपये प्रति किलो दर देत आहे.व्यापारी जाग्यावरून घेऊन जात असल्यामुळे हा दर मला परवडत आहे.
कोकणात पिकवला जाणारा भाजीपाला मार्केटमध्ये विकताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोकणात स्थानिक मार्केट मोठं नसल्यामुळे जे बाहेरून विजापूर, बेळगाव ,कोल्हापूर, हे व्यापारी कोकणात येतात. त्यामुळे कोकणातल्या मालाला हमीभाव देत नाहीत.बाहेरचे व्यापारी प्रत्येक वेळी मालाला नावं ठेवतात.आपल्याकडून कवडीमोल दराने विकत घेतात.काही वेळा पेमेंट देताना सुद्धा त्रास दिला जातो.मात्र कोकणातला चागला भाजीपाला असून सुद्धा दर दिला जात नाही.त्यामुळे इथला शेतकरी हवालदिल होत चाललेला आहे.
कोकणात उत्तम प्रतीचे मार्केट यार्ड होणे गरजेचे आहे. अशी मागणी या प्रगतशील कोकणातल्या शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळत आहे. जिल्हा बाहेरून येणारे व्यापारी वर्ग हा स्थानिक शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला नाव ठेवत त्रास देत असतात. हल लागलेला कलंक वेळीच दूर करायचा असेल तर कोकणात उत्तम दर्जाचे मार्केट यार्ड असणे गरजेचे आहे. त्यातून लाखो रुपयांची उलाढाल होऊ शकते आणि कोकणातला शेतकरी सुद्धा सावरू शकतो.