सिंधुदुर्ग – फुकेरी येथील हनुमंतगड येथे बोलेरो पिकपक गाडीतून खडी उतरवण्यास गेलेल्या चार जणांपैकी सिद्धेश आईर याला गोळी लागली आहे.
जंगलात कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हयगयीने बंदुक वापरून सिद्धेश याला जखमी केल्याचा आज्ञाता विरुद्ध आयपीसी ३३७ ३३८ २८६ सहा शस्त्र अधिनियम कलम३(१)२५,२७ प्रमाणे दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी ज्ञानेश्वर कृष्णा आईर तसेच विठ्ठल ठिकार, रघुनाथ आईर, सिद्धेश आईर, साई आईर आदी बोलेरो पिकपने फुकेरी हनुमंत गड या ठिकाणी खडी उतरण्यास गेले होते.
तेथून परतताना जांभळीचे भरड येथे गाडी आली असता जंगलातून कोणीतरी अज्ञाताने हयगयीने बंदुक चालवून बोलेरो च्या हौद्यात बसलेल्या कु सिद्धेश आईर याला जखमी केले त्याला गंभीर दुखापत झाली असून तो गोव्यात उपचार घेत आहे या घटनेचा अधिक तपास स पो नि ठाकूर हे पोलीस निरीक्षक आर जी नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
सदरची घटना गंभीर असून तो अज्ञात इसम बंदुक घेऊन नेमका काय करत होता? रानटी प्राण्यांची शिकार की जखमी बरोबर त्याचे काही पूर्वीचे वाद आदी अनेक शक्यतांचा विचार करून पोलिसांना तपास करावा लागणार असुन संशयिताला पकडण्याचे मोठे आवाहन दोडामार्ग पोलिसांसमोर आहे.