पुणे मेडिकल कॉलेज येथील ४ तज्ञ डॉक्टरांची सिंधुदुर्गात नियुक्ती – आमदार वैभव नाईक यांची माहिती

0
260

सिंधुदुर्ग – कोविड साथरोगाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असल्यामुळे साथरोगावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी डॉकटर देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार टास्क फोर्स अंतर्गत बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील औषधवैद्यकशास्त्र विषयातील ४ तज्ञ डॉक्टरांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आली आहे.१५ दिवसांकरीता हि नेमणूक करण्यात आली असून त्यांनी प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे असे लेखी आदेश मुंबई,वैद्यकीय शिक्षण व संशोधनच्या संचालकांनी काढले आहेत.

यामध्ये औषधवैद्यकशास्त्र विषयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. आनंद कापडिया, सहाय्यक प्राध्यापक डॉ. गिरीष कदम, कनिष्ठ निवासी-२ डॉ. विक्रम हाटेकर, व कनिष्ठ निवासी-२ डॉ. सुदीप परब या ४ तज्ञ डॉक्टरांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्यात आली आहे. याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here