रत्नागिरी – सोमवारी पहाटेच्या सुमारास मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिनेस्टाईल थरारक पाठलाग करून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय मार्ग महामार्गावर विदेशी हुंडाई व क्रेटा या आलिशान कारमधून पळ काढणाऱ्या संशयित वाहनाचा सिनेस्टाईलने पाठलाग करत विदेशी दारू वाहतुकीसह संशयित आरोपींना पकडण्यात आला आहे. या कारवाईत एकूण 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून भरारी पथकाकडून गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाची पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केले आहे. मात्र यामुळे पुन्हा एकदा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची छुपी वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाला आहे.
नाताळ व ३१ डिसेंबरच्या पाश्र्वभूमीवर 11 डिसेंबर रोजी सोमवारी पहाटे रोजी गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरुन गस्त घालत असताना उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला खबऱ्याकडून मोठी टीप मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्य बनावट विदेशी दारुची वाहतूक होणार असलेची बातमी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. तातडीने या पथकाने सदर पथकाने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर एस.टी. स्टैंड समोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर थांबून वाहनांची तपासणी सुरू केली. आणि पहाटे चार वाजवण्याच्या सुमारास गोव्याच्या दिशेकडून येणाऱ्या राखाडी रंगाच्या चारचाकी मोटार कारला थांबविण्याचा इशारा केला असता पथकाला चुकवून सदर वाहनाचा चालक न थांबता भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकून तेथून वाहनासह पळ काढला. संशयित आलिशान क्रेटा कार चालकाने आपल्या ताब्यातील हयुंडाई कंपनीची क्रेटा या वाहनातून पळ काढला मात्र भरारी पथकाने सिनेस्टाईलने पाठलाग करून ही कार रोखून धरत अडवण्यात यश मिळवलं. आणि कार चालकालाही जागीच पकडले. त्यामुळे भरारी पथकाला गुंगारा देऊन त्यांच्यासमोरच पळ काढणाऱ्या पाठलाग करुन संशयित आरोपी इसमांना पकडण्यात आले. सदर वाहनचालकाच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच.07 ए.एस 7301 यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे एकूण 4 लाख 65 हजार 120 रुपये किंमतीचे 81 बॉक्स मिळून आले. या मोठ्या कारवाईत आलिशान क्रेटा कार सहित एकूण 16 लाख 65 हजार 120/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी इसम ओंकार इंद्रजीत सावंत व सहआरोपी वैभव मनोज कांबळी याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय दळवी, दु. निरीक्षक सचिन यादव, दु. निरीक्षक श्री, शैलेश कदम, जवान श्री. वैभव सोनावले, महिला जवान सुजल घुडे, व जवान वाहनचालक मलिक धोत्रे यांनी कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संजय दळवी. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी भरारी पथक करीत आहेत.