सिंधुदुर्ग – स्वाभिमान पक्ष दोन वर्षात विसर्जित केला,ज्या शिवसेनेने वडिलांना दोन वेळा पाडले, एकदा भावाला पाडले,त्यांनी शिवसेनेवर काय बोलावे. हे दुर्दैव आहे अशी टीका आमदार नितेश राणे यांच्यावर शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केले.
कणकवलीत ते माध्यमांशी बोलत होते. पुढील काळात तिसऱ्यांदा विनायक राऊत बहुमतांनी निवडुन येतील. जे नितेश राणे उदय सामंत यांना दरदिवशी दोनवेळा फोन करतात, किरण सामंत यांना तुमची माणसे भेटतात. मग त्यांच्यावर टीका करत जनतेची दिशाभूल कश्यासाठी ?
मुबंईतील राजेंद्र कदम प्रकरण लोकांना माहीत आहे. परमवीर सिंग यांचे हाल काय आहेत, हे नितेश राणेंनी लक्षात ठेवावे, असा इशारा देतानाच जन आशीर्वाद यात्रा नव्हे तर ही दिल्लीश्वर आशीर्वाद यात्रा आहे. तुमच्या परिवाराचे अवगुण संपुर्ण जिल्ह्याला माहीत आहेत.
नितेश राणे तुमची वक्तव्य थांबवा, नाहीतर शिवसैनिक तुम्हाला जागा दाखवतील, असा इशारा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिला आहे.
ठाकरे सरकार अतिशय चांगल्या प्रकारे राज्य चालवत आहेत.खा.विनायक राऊत हे तिसऱ्यांदा हट्रिक करणार आहेत.शिवसेनेत कुणाला कुठल्या पदावर बसवायचे हा निर्णय ठाकरे घेतात.
पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगले काम केले आहे,त्याची बदनामी करु नये.मागील राऊत यांच्या निवडणुकीत तुम्ही भावाला पाडवण्यासाठी मदत केली होती का?असा सवाल अतुल रावराणे यांनी केला.