नोटीसला लेखी उत्तर दिले आमदार नितेश राणे यांची माहिती आमदार नितेश राणे पोलिस स्टेशनमध्ये हजर राहणार नसल्याचेही केले स्पष्ट

0
306

 

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासकामी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना कणकवली पोलिस निरीक्षक यांनी समक्ष हजर राहण्याबाबत नोटीस बजावली आहे.

 

संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ज्या इनोवा कार ने परब यांच्या दुचाकीला धडक देत त्यानंतर त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले व त्यानंतर त्या कारमधील दोन संशयितांनी आमदार नितेश राणे व गोट्या सावंत यांना कळवायला पाहिजे असे सांगत ईनोव्हा कार ने ते संशयित पळाले अशी फिर्याद श्री परब यांनी पोलिसात दिली होती.

 

त्या अनुषंगाने कणकवली पोलिस निरीक्षकांनी श्री राणे व गोट्या सावंत यांना चौकशीकरिता समक्ष उपस्थित राहण्याची नोटीस दिली आहे. याप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी या नोटीस च्या अनुषंगाने भूमिका स्पष्ट केली असून, याबाबत मुबईत माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी पोलिसांच्या नोटीसला लेखी उत्तर दिल्याचे सांगितले.

 

त्यामुळे या नोटीस च्या अनुषंगाने हजर राहण्याचा कोणताही प्रश्न राहत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच दापोली मध्ये ज्या पद्धतीने अनिल परब विरुद्ध रामदास कदम असा वाद आहे तसाच वाद सिधुदुर्गात विनायक राऊत विरुद्ध किरण सामंत यांच्यात आहे.

 

असा दावा देखील श्री राणे यांनी केला आहे. त्या वादाचे पडसाद या कार्यकर्त्यांवर उमटत आहेत. त्यांना कुणीतरी बळीचा बकरा पाहिजे याकरिता माझं नाव त्यामध्ये टाकला आहे असेही राणे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here