सिंधुदुर्ग : नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या राड्या नंतर आज उबाठा सेनेने सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली.त्यांनंतर निवेदन देखील दिले.
देवगड येथे रुग्णालय सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आले होते.त्यावेळी उबाठा सेनेच्या रुग्णालयात आंदोलन केले.त्यानंतर नितेश राणे घेरण्याचा प्रयत्न केला.एवढेच नव्हे तर तर रुग्णालय परिसरात तमाशा करू नका आपण बसून बोलू अशी भूमिका घेत आमदार नितेश राणे यांनी धरलेला हात उबाठाचे शिवसेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी सोडून शेवटी चर्चेतून पळ काढला.ही बैठक सुरू होण्याआधीच उबाठा शिवसेनेचे काही कार्यकर्ते तालुकाप्रमुख गणेश गावकर, तालुकाप्रमुख जयेश नर याच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यासाठी जमले होते. आमदार नितेश राणे यांनी सल्लागार समितीची बैठक आटोपली व ते जाण्यासाठी निघत असतानाच रुग्णालयाच्या पॅसेजमध्येच अडचणीच्या ठिकाणी जमिनीवर बसून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. देवगड रुग्णालयातील रिक्त असलेल्या अधिकारी कर्मचारी व डॉक्टरच्या पोस्ट यावर हे आंदोलन त्याने छेडले होते.
देवगड ग्रामीण रुग्णालय येथे काल सोमवारी आमदार नितेश राणे उद्धव बाळासाहेब ठाकरे कटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. आज याबाबत आमदार नितेश राणे व खाजगी सुरक्षारक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांची भेट घेण्यात आली. तर आमदार नितेश राणे यांच्यासह त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक व त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून बेकायदेशीर रित्या जमाव करून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला तसेच नितेश आणि माझा हात पकडून मला इतर ठिकाणी न्यायचा प्रयत्न करत होते त्यामुळे आमदार नितेश राणे व त्यांच्या खाजगी सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देवगड युवा सेना तालुकाप्रमुख गणेश गावकर यांनी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांना देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी असून देवगड ग्रामीण रूग्णालय याठीकाणी वैद्यकीय अधीकारी रिक्त पदांच्या भरतीसाठी पाठपुरावा करत आहोत. सोमवार दि. 09 ऑक्टोबर रोजी आम्ही जिल्हा वैद्यकीय अधीकारी यांच्या बैठकी दरम्यान देवगड रुग्णालय याठीकाणी भेट घेण्यासाठी आलो असता त्याठीकाणी स्थानीक आमदार नितेश राणे व त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक तसेच काही गुंड प्रवृत्तीचे कार्यकतें है बेकायदेशीरित्या जमाव करून माझे अपहरण करण्याचा प्रयत्न केला तसेच नितेश राणे यांनी माझा हात पकडून मला जबरदस्तीने इतर ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी स्थानीक पोलीस निरीक्षक श्री. नीळकंठ बगळे हे बघ्याची भूमीका घेताना दिसत असून पक्षपाती कारवाई करताना दिसून येत आहेत. या घटनेचे संपूर्ण चित्रीकरण प्रसारमाध्यमातून नीदर्शनास येत आहे. तरी माझ्या बाबतीत दखलपात्र घटना घडण्याची तसेच जीवाचे बरे वाईट करण्याची शक्यता आहे, तरी आपण स्वतः याची दखल घेऊन आमदार नितेश राणे व खाजगी सुरक्षा रक्षकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.
आमदार नितेश राणे व त्यांच्या खाजगी सुरक्षारक्षक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्याकडून जीवितास धोका असल्याबाबत लेखी तक्रार देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जिल्हाप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख जयेश नर, देवगड तालुका युवा सेना प्रमुख गणेश गावकर, तेजस राणे संतोष परब, रमेश चव्हाण, कन्हैया पारकर आदी उबाठा पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.