सिंधुदुर्ग – महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून नांदगाव तळेरे, कासार्डे, कणकवली या ठिकाणच्या पुलांची कामे बाकी आहेत. ही कामे येत्या महिन्यात मार्गी लागल्यानंतर दोन महिन्यात महामार्गाच्या चौपदरीकरनाचे काम लोकार्पण आ साठी सज्ज होईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली.
खारेपाटण ते झाराप असा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या पाहणीचा दौऱ्या प्रसंगी कणकवलीत पत्रकारांशी श्री राऊत बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता सलीम शेख, उप अभियंता अमोल ओटवणेकर, ठेकेदार कंपनीचे व्यवस्थापक के के गौतम, केसीसी कंपनीचे व्यवस्थापक मनोज पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, सचिन सावंत, राजू राठोड, सुजित जाधव, हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, अनुप वारंग, विलास कोरगावकर, महेश कोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कणकवली शहरातील फ्लायओव्हरचे काम तातडीने करण्याच्या सूचना श्री राऊत यांनी ठेकेदार कंपनी व अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शहरात जे मिसिंग प्लॉट आहेत त्यांचे तातडीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करत शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य नियोजन करा असे सांगितले. यावेळी सुशांत नाईक व शैलेश भोगले यांनी कणकवली नरडवे चौक, तहसीलदार कार्यालय समोर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, डीपी रोड, पटवर्धन चौक, भालचंद्र महाराज आश्रम रोड, स्टेट बँके जवळ फ्लाय ओव्हर ब्रिज खालील डिव्हायडर मध्ये मिडल कट ठेवावा अशी मागणी केली. त्यावर श्री राऊत यांनी येत्या काळात वाहतुकीला अडथळा होणार नाही अशी पुरेशी जागा सोडून ठेवा. तसेच खालील जे डीवाईडर लावण्यात आले ते अजून आत मध्ये बसवून रस्ता रुंद ठेवा अशा सूचना दिल्या. सुशांत नाईक यांनी फ्लाय ओव्हर ब्रिज खाली वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तर कन्हैया पारकर यांनी रस्त्यालगत बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांसाठी खाली जागा द्या व त्या विक्रेत्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली. त्यावर श्री राऊत यांनी जरी फ्लाय ओव्हर ब्रिज वरून वाहतूक सुरू झाली तरी कणकवली शहरातील खालील सर्विस रोड वर प्रश्न राहता नये. त्यादृष्टीने काम करा. इंडियन ऑइल मार्फत शौचालयासाठी सीएसआर फंड उपलब्ध करून देण्यात येईल. त्याकरिता उच्च न्यायालयाचे आदेश तपासून पहात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली शौचालय व पार्किंग बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शहरातील अंतर्गत रस्ते महामार्गाला जोडतात त्या ठिकाणी अरुंद जागा न ठेवता पुरेसी मुबलक मिडल कट ठेवा अशी मागणी सुशांत नाईक यांनी केली.तर स्टेट बँकेचे समोरील जागेत रेलिंग करू नका हॉटेल मंजुनाथ स्टेट बँक यांच्या पार्किंग साठी जागा खुली ठेवा अशा सूचना श्री राऊत यांनी दिल्या. कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज च्या अंतर्गत येणाऱ्या कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिज संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून या या संदर्भात निर्णयाची प्रतीक्षा असल्याचे श्री राऊत यांनी सांगितले. कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली शौचालय बांधण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत. मात्र खाली जर शौचालय बांधता आले नाही तर नगरपंचायत जवळ जागेची मागणी करण्यात येणार आहे. नगरपंचायतने जागा उपलब्ध करून दिल्यास इंडियन ऑइल च्या सीएसआर फंडातून पे अँड पार्क या तत्वावर शौचालय उभारणी करण्यात येईल असेही राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच कणकवली शहरातील दुरावस्था झालेल्या महामार्गालगतच्या गटारांच्या प्रश्नही तातडीने सोडविण्याच्या सूचना श्री राऊत यांना यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.