सिंधुदुर्ग – टेम्पो ट्रॅव्हलर मधून गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना दोडामार्ग पोलिसांनी आंध्रप्रदेश येथील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख १६ हजाराच्या दारुसह ८ लाख किमतीची गाडी असा मिळून तब्बल सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई सुमारास विजघर चेक पोस्ट येथे करण्यात आली. महेंद काटना रा.आंध्रप्रदेश असे ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबतची तक्रार पोलीस हवालदार आशिष लवांगरे यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्यात केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रिजवाना नदाफ श्री. गवस व श्री. सुतार यांनी केली.