सिंधुदुर्ग – दोडामार्ग पोलिस निरीक्षक आर जी नदाफ यांनी आपल्या पोलीस पथकासह अवैध गुटखा व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे.
लाखो रुपये किमंतिचा गुटखा जप्त करत दोडामार्ग तालुक्यात पहिलीच मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत त्यांनी वाहनासह एकाला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली आहे.
चोरटा व्यवसाय करणाऱ्यांचे यामुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत. दारू पाठोपाठ पोलीस निरीक्षक नदाफ यांनी गुटखावर मोठी कारवाई केली आहे.
दोडामार्ग ते बांदा मार्गावर मोरगांव येथे ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक आर जी नदाफ, यांच्यासह पोलिस सुरजसिंग ठाकूर, अनिल पाटील,चालक दिपक सुतार आदींनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री बंद असताना अनेक ठिकाणी दुकानातून गुटखा विक्री केली जाते आहे.