देवगड-गिर्ये येथे खडकाला आदळून बोट दुर्घटनाग्रस्त 24 खलाशांना वाचविण्यात यश

0
135

सिंधुदुर्ग – देवगड गिर्ये समुद्रकिनारी सोमवारी सकाळी तीन वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी येथील अजीम होडेकर मालकीची बोट हसनेन ही खडकाला हाताळून दुर्घटना झाली या दुर्घटनेत बोटीचे मोठे नुकसान झाले असून मात्र त्यामधील असलेले चोवीस खलाशी बाजूलाच असलेल्या चार बोटी ने सुखरूप त्यांना समुद्रकिनारी आणण्यामध्ये यश मिळाले आहे

रत्नागिरी येथील अजीम घोडेकर या मालकाची बोट मच्छिमारी करण्यासाठी देवगड गिर्य समुद्रकिनारी आली असता सदर बोट खडकाळ भागात गेल्याने बोट दगडाला आदळून पलटी झाली. सदर बोटीमध्ये चोवीस खलाशी होते मात्र सदरची बोट दगडाला आदळून पलटी झाल्याची खबर त्याच बोटीवरील एका खलाशाने काही वावर असलेल्या रत्नागिरी येथील बोटीवरील खलाशांची संपर्क करून सदर दुर्घटनेची माहिती देतात त्या ठिकाणी तात्काळ शेजारी असलेल्या चार बोटी दाखल होऊन त्या बोटीवरील चोवीस खलाशांना आपल्या बोटी वरती घेऊन सुखरूप बाहेर काढले.

सदरची दुर्घटनाही सोमवारी सकाळी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र बोटीवरील छोट्या होडी असल्याने त्या होळीच्या सहाय्याने चोवीस खलाशी आपला बचाव करण्यासाठी यशस्वी झाले आहे.

सदर बोटी वरील चोवीस खलाशांना समुद्रातून बाहेर काढण्यासाठी त्या चार बोटीवरील खलाशांना पाच ते सहा तास संघर्ष करून त्या चोवीस खलाशांना बाहेर काढण्यात यश मिळाले आहे.

कारण दुर्घटना झालेली बोटही खडकाळ भागात असल्याने त्या ठिकाणी दुसरी बोट बचावासाठी नेणे म्हणजे जीवाशी वेतनाचा चा खेळ होता मात्र अशा परिस्थितीत शेजारी असलेल्या त्या चार बोटीने व त्यावरील असलेल्या खलाशांनी शर्थीचे प्रयत्न करून त्या खडकाळ भागात आपल्या बोटीने जीवघेणा प्रवास करून अखेर त्या खलाशांना संघर्षमय परिस्थितीत सामोरे जाऊन त्यात 24 खलाशांना सुखरूप बाहेर काढले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here