सिंधुदुर्ग – जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाचा फटका कृषी विभागाला बसला असून भातशेती व बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील हे नुकसान असून जिल्ह्यातील या कृषी क्षेत्रातील नुकसानी पोटी १७ कोटी रूपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे अशी माहिती शुक्रवारी झालेल्या कृषी समिती सभेत देण्यात आली.
कृषी समितीची सभा शुक्रवारी ऑनलाईन पध्दतीने जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. गटनेते रणजित देसाई या वेळी न्यायालय संजय देसाई वर्षा पवार अनुप्रिती खोचरे सायली सावंत गणेश राणे त्यासाठी कृषी अधिकारी सुधीर चव्हाण कृषी अधिक्षक एस एन म्हेत्रे उपस्थित होते.
शासनाने तौक्ते चक्रीवादळात कृषी विभागासाठी सतरा कोटी रूपयांची मदत जाहीर केली असली तरीही जीपस सदस्य गणेश राणे यांनी शेतकऱ्यांचे योग्य पध्दतीने पंचनामे झाले नसल्याचा आरोप केला आहे. रत्न सिंधू योजनेमध्ये पावत ट्रॅक्टर योजनेचा समावेश व्हावा याबाबत सभापती राजेंद्र म्हापसेकर यांनी लक्ष वेधत तसा ठराव शासनाकडे तातडीने पाठवावा अशाही सूचना सभागृहात दिल्या. साळगाव येथे १ जुलै रोजी होणार्या कृषी दिनानिमित्त जिल्हास्तरीय कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यातील कृषी व्यवसायाला बसला होता. शेतकऱ्यांच्या फळबागायतीचे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचे योग्य पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली. शासनाने मंजूर केलेले सतरा कोटी रु. लवकरात लवकर बाधित झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे याकडे हे सदस्यांनी लक्ष वेधले.