कणकवली : रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार यांच्या ” बाबांनी लावलेले झाड ” या तिसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कणकवलीतील वरीष्ठ फिजिशियन मधुमेह तज्ञ डॉ. बी. एस म्हाडेश्वर यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. यावेळी देवगडचे कवी प्रमोद जोशी, मालवणच्या (सध्या मुंबई) साहित्यिका श्वेता सावंत, कवयित्री सरिता पवार यांनी ऑनलाइन सहभाग घेतला.
डॉ.सतीश पवार यांच्या बाबांनी लावलेले झाड या काव्यसंग्रहाची प्रस्तावना प्रमोद जोशी यांनी तर अभिप्राय श्वेता सावंत यांनी लिहिला आहे. अक्षरजुळणी प्रा अमर पवार , आणि मुखपृष्ठ डॉ अभिजित भावसार यांचे आहे.
कवितासंग्रह आजी सरस्वती लक्ष्मण पवार याना डॉ पवार यांनी अर्पण केला आहे. डॉ.पवार यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यामुळे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन शिक्षक दिनी केले आहे.
हा काव्यसंग्रह इबुक स्वरूपात असून पीडीइफ आणि ईपब मध्ये मोफत उपलब्ध आहे. इपब साठी गुगल स्टोअरचे प्ले बुक्स हे अँप वापरावे. डॉ.सतीश पवार यांचे याआधी मी कवी थातूरमातूर आणि टाळतो मी रस्ता गर्दीचा या दोन्ही इबुक स्वरूपातील काव्यसंग्रहाना वाचकांची अमाप पसंती लाभली आहे. काव्यसंग्रह प्रकाशनासाठी डॉ धनंजय रासम, शैलेश घाडी, ओंकार तेली, मीनाक्षी चव्हाण, मनाली घाडी, माधवी चव्हाण यांनी परिश्रम घेतले.