सिंधुदुर्ग : नोव्हेंबर महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा केवळ १३ टक्केच निधी खर्च झाला आहे. १४ कोटी ४६ लाखा पैकी फक्त १ कोटी ८८ लाख एवढाच निधी खर्च झाला असून पुढील चार महिन्यात तब्बल ८३ टक्के निधी म्हणजेच १२ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्याची कसरत करावी लागणार आहे.
जिल्हा परिषद वित्त समितीच्या मासिक सर्वसाधारण सभेतून हा विषय समोर आला आहे.
आजच्या वित्त समिती सभेत खर्चाचा आढावा घेतला असता जिल्हा परिषद स्व उत्पन्न निधी १४ कोटी ४६ लाख पैकी आतापर्यंत केवळ १ कोटी ८२ लाख ७७ हजार ६३२ एवढाच निधी खर्च झाला आहे.
याचे टक्केवारी केवळ १३ टक्के एवढी आहे. हस्तांतरित योजना ४११ कोटी ३६ लाख ६३ हजार ७६४ पैकी ३३९ कोटी ५७ लाख ४० हजार ५८६ रुपये एवढा निधी खर्च झाला आहे तर याची टक्केवारी ८३ टक्के एवढी आहे.
अभिकरण योजना १४ कोटी ५८ लाख ७४ हजार ३५२ रुपये पैकी १० कोटी ७८ लाख ७१ हजार ७४८ रुपये एवढा निधी खर्च झाला असून त्याची टक्केवारी ७४ टक्के एवढी आहे. दुरुस्ती देखभाल योजना ७ कोटी १५ लाख २३ हजार ६०० रुपये पैकी ८८ लाख १४ हजार ३ रुपये एवढा निधी खर्च झाला असून त्याची टक्केवारी १२ टक्के एवढी आहे.
तसेच खासदार निधी १ कोटी २७ लाख ९६ हजार ७१० पैकी ७५ लाख ४८ हजार ४६३ रुपये एवढा निधी खर्च झाला असून त्याची टक्केवारी ५९ टक्के एवढी आहे.