चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीच्या तीन हजार बसची व्यवस्था, कणकवलीत परिवहन मंत्र्यांची माहिती

0
235

सिंधुदुर्ग – चतुर्थी सणाला मोठ्या संख्येने दाखल झालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटीने तीन हजार बसची व्यवस्था केली असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. ते कणकवली येथे बोलत होते.

दरम्यान कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल झाले होते. या प्रवाशांनी देखील परतीच्या प्रवासासाठी स्वस्त एसटी प्रवासाला पसंती दिली आहे. रेल्वे सुरू झाली आहे, मात्र रेल्वे आरक्षणासाठी ‘विशेष भाडे दर’ आकारण्यात येत आहे. यामुळे थेट गावावरून सुटणाऱ्या बसला प्रवासी प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे.

कोकणात गणपती उत्सव हा महत्वाचा सन आहे. काहीही झाले तरी मुंबईकर चाकरमानी या सणाला आवर्जून येतात. या वर्षी कोरोनाचे संकट असले तरी त्यावर मात करत चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी सज्ज असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here