घाटीवडे येथे दोन एसटींचा अपघात सुदैवाने प्राणहानी टळली, सात जण जखमी;एसटी चालकावर गुन्हा दाखल

0
3047

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग वीजघर मार्गावरील घाटीवडे येथील वळणाकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने एसटी बस चालविल्याने दोन एसटी बस रस्ता सोडून बाहेर गेल्या आणि अपघात झाला.त्यातील बेळगाव गाडी भरधाव वेगातच रस्ता सोडून बाहेर जंगलात गेली आणि आरडाओरड झाली.प्रवाशांनी चालकाच्या दरवाजातून बाहेर उडया टाकल्या.वीजघर गाडीही मागच्या बाजूने गटारात गेली. या अपघातात सात जण जखमी झाले.त्यातील काहींवर साटेली भेडशी आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

प्रवाशांचे सुदैव म्हणून दोन्ही गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली नाही;अन्यथा चालकाच्या मस्तीमुळे निष्पाप प्रवाशांना नाहक जीव गमवावा लागला असता.
दरम्यान, याप्रकरणी वीजघर दोडामार्ग एसटीचे (एमएच 14 बीटी 3871)चालक श्रीकृष्ण प्रदीप राऊत (वय 33,पडवे माजगाव,सावंतवाडी आगार) यांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.त्यावरून पोलिसांनी सावंतवाडी बेळगाव एसटीचे (एमएच 14 बीटी 3874) चालक सर्वेश प्रमोद घाडी(रा. कोलगाव,सावंतवाडी आगार) यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केल्याची माहिती येथील पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली. अपघात सकाळी साडेदहाच्या दरम्यान झाला.

अपघातातील जखमींची नावे-

1). रिया मालू गवस वय 14 वर्षे राहणार केंद्रे पुनर्वसन ता.दोडामार्ग 2.) वैभव लक्ष्मण नाईक वय 13 वर्षे राहणार केंद्रे पुनर्वसन ता.दोडामार्ग 3). उलगप्पा गंगाप्पा पंडिवडार वय 55 वर्षे राहणार बांदा ता.सावंतवाडी 4.) भागीरथी उलगप्पा पंडिवडार वय 50 वर्षे रा. बांदा ता. सावंतवाडी 5.) भागुबाई कोया पटकरे वय 60 वर्षे राहणार मुंडगोड उत्तर कन्नडा 6.) शशिकला शांताराम बेर्डे वय 65 वर्षें रा.पारगड 7). परशु कृष्णा पाटील वय 53 वर्षे रा.गुडेवाडी ता. चंदगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here