पणजी: 28,29 आणि 30 जून रोजी विन्सन वर्ल्ड आणि फक्त मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.28 रोजी सायंकाळी 5 वाजता उद्धाटन सोहळा होणार असून 29 पासून सिनेमांचे प्रदर्शन केले जाणार आहे.
उद्धाटन सोहळ्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत,कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे,शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह बॉलीवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई उपस्थित राहणार आहेत.
सोहळ्यात सिनेसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना चतुरस्र अभिनेता, अभिनेत्री, फक्त मराठी अभिमान पुरस्कार, समाजरत्न पुरस्कार, कला गौरव, विशेष गौरव या विभागात पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येणार आहे.कृतज्ञता पुरस्कार यंदा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांना प्रदान केला जाणार आहे.फक्त मराठीच्या संयुक्त विद्यमाने यंदा दिग्गज कलाकारांच्या सहभागाने मनोरंजनाचा तीन तासांचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून त्यात गोमचिम गौरव पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या महोत्सवात चित्रपट कलाकारांची मांदियाळी असणार आहे. या महोत्सवासाठी मेघा धाडे, सई ताह्मणकर, श्रुती मराठे, सई देवधर, दिलीप प्रभावळकर, नागराज मंजुळे, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी,नेहा महाजन, रिंकू राजगुरू, सोनल अरोरा, कृतिका तुळसकर, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, आदी दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे.
गोमचिम 2019 मध्ये प्रदर्शित केले जाणारे सिनेमा,त्यांचे थिएटर आणि वेळ पुढीलप्रमाणे…
शनिवार 29 जून 2019
कला अकादमी
मुळशी पॅटर्न
सकाळी 10 ते दुपारी 12
(दिग्दर्शक:प्रवीण तरडे)
बस्ता
दुपारी 12.30 ते 2.30
(दिग्दर्शक:तानाजी घाडगे)
मोगरा फुलला
दुपारी 3 ते सायंकाळी 5
(दिग्दर्शक:स्वप्निल जोशी)
होडी
सायंकाळी 6.30 ते रात्री 8
(दिग्दर्शक गजेंद्र अहिरे)
आइनॉक्स
नाळ
सकाळी 9 ते 11
(दिग्दर्शक:सुधाकर रेड्डी याकांती)
म्होरक्या
सकाळी 11.30 ते दुपारी 1.30
(दिग्दर्शक:अमर देवकर)
कागर
दुपारी 2.05 ते सायंकाळी 4.20
(दिग्दर्शक:मकरंद कांठाळे)
दिठी
सायंकाळी 5 ते 6.30
(दिग्दर्शक:सुमित्रा भावे)
खटला बिटला
सायंकाळी 7 ते रात्री 8.40
(दिग्दर्शक:परेश मोकाशी)
मॅकेनिझ पॅलेस 1
वेडिंगचा सिनेमा
सकाळी 9.15 ते 11.35
(दिग्दर्शक:सलिल कुलकर्णी)
डोंबीवली रिटर्न
दुपारी 12.05 ते 2.05
(दिग्दर्शक:संदीप कुलकर्णी)
चुंबक
दुपारी 2.40 ते 4.45
(दिग्दर्शक:संदीप मोदी)
इमेगो
सायंकाळी 5.15 ते 6.55
(दिग्दर्शक:करण चव्हाण)
भोंगा
सायंकाळी 7.30 ते 9.05
(दिग्दर्शक:शिवाजी पाटील)
मॅकेनिझ पॅलेस 1
अहिल्या
सकाळी 10 ते दुपारी 12.05
(दिग्दर्शक:राजू पार्सेकर)
आरोन
दुपारी12.30 ते 2.30
(दिग्दर्शक:ओमकार शेट्टी)
लघुपट
पोस्ट मॉर्टम,गधूळ, पाम्पलेट
दुपारी 3.15 ते सायंकाळी 5
(दिग्दर्शक:विनोद कांबळे,गणेश शेलकर,शेखर रणखांबे)
सुर सपाटा
सायंकाळी 5.30 ते 7.55
(दिग्दर्शक:मंगेश कांठाळे)
1930 वास्को
सुर सपाटा
सकाळी 9 ते 11.15
(दिग्दर्शक:मंगेश कांठाळे)
आरोन
सायंकाळी 4.30 ते 6.30
(दिग्दर्शक:ओमकार शेट्टी)
रविवार 30 जून 2019
कला अकादमी
भोंगा
सकाळी9.30 ते 11.15
(दिग्दर्शक:शिवाजी पाटील)
इमेगो
सकाळी 11.35 ते दुपारी 1.15
(दिग्दर्शक:करण चव्हाण)
मिरांडा हाऊस
दुपारी 1.45 ते 3.10
(दिग्दर्शक:राजेंद्र तालक)
आरोन
दुपारी 3.40 ते 5.40
(दिग्दर्शक:ओमकार शेट्टी)
समारोप सिनेमा
पाणी
सायंकाळी 6.30 नंतर
(दिग्दर्शक:आदित्य कोठारे)
आइनॉक्स
सुर सपाटा
सकाळी 9 ते 11.15
(दिग्दर्शक:मंगेश कांठाळे)
कागर
सकाळी 11.45 ते दुपारी 1.55
(दिग्दर्शक:मकरंद कांठाळे)
वेडिंगचा सिनेमा
दुपारी 2.25 ते सायंकाळी 4.45
(दिग्दर्शक:सलिल कुलकर्णी)
खटला बिटला
सायंकाळी 5.17 ते सायंकाळी 7
(दिग्दर्शक:परेश मोकाशी)
अहिल्या
सायंकाळी 7.30 ते रात्री 9.35
(दिग्दर्शक:राजू पार्सेकर)
मॅकेनिझ पॅलेस 1
दिठी
सायंकाळी 9.15 ते 10.45
(दिग्दर्शक:सुमित्रा भावे)
लघुपट
पोस्ट मॉर्टम,गधूळ, पाम्पलेट
सकाळी 11.20 ते दुपारी 12.50
(दिग्दर्शक:विनोद कांबळे,गणेश शेलकर,शेखर रणखांबे)
होडी
दुपारी 1.20 ते दुपारी 2.50
(दिग्दर्शक:गजेंद्र अहिरे)
नाळ
दुपारी 3.20 ते सायंकाळी 5.20
(दिग्दर्शक:सुधाकर रेड्डी याकांती)
मुळशी पॅटर्न
सायंकाळी 5.50 ते 7.50
(दिग्दर्शक:प्रवीण तरडे)
मॅकेनिझ पॅलेस 2
चुंबक
सकाळी 9.30 ते 11.35
(दिग्दर्शक:संदीप मोदी)
म्होरक्या
दुपारी 12 ते दुपारी 2.05
(दिग्दर्शक:अमर देवकर)
बस्ता
दुपारी 2.30 ते सायंकाळी 4.30
(दिग्दर्शक:तानाजी घाडगे)
डोंबीवली रिटर्न
सायंकाळी 5 ते सायंकाळी 7
(दिग्दर्शक:संदीप कुलकर्णी)
1930 वास्को
मुळशी पॅटर्न
सकाळी 10 ते दुपारी 12
(दिग्दर्शक:प्रवीण तरडे)
सुर सपाटा
रात्री 9 ते 11.15
(दिग्दर्शक:मंगेश कांठाळे)