गोमचिमच्या उद्धाटन सोहळ्याला यंदा मनोरंजनाचा धमाका

0
410

पणजी:12 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवात यंदा चित्रपटप्रेमीमींना दर्जेदार नव्या कोऱ्या सिनेमांची पर्वणी मिळणार आहे. शिवाय उद्धाटन सोहळा यादगार ठरण्यासाठी ‘फक्त मराठी’या आघाडीच्या मराठी वाहिनीच्या सहकार्याने मनोरंजनाची फूल तू धमाल असलेला ‘गोमचिम गौरव सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.यात मराठी चित्रपटसृष्टि मधील नामवंत कलाकार आपली कला पेश करणार आहेत.

गोवा मराठी चित्रपट
महोत्सवाने यंदा 12 व्या वर्षात पदार्पण केले आहे.हा प्रवास यादगार व्हावा यासाठी विन्सन वर्ल्डने यंदा विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,असे सांगून गोमचिमचे संचालक संजय शेट्ये म्हणाले,कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात उद्धाटन सोहळ्याला जोडून तीन तासांच्या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.’फक्त मराठी’ या मनोरंजन विश्वातील आघाडीच्या मराठी वाहिनीच्या संयक्त विद्यमाने मनोरंजनाचा तडका लगावला जाणार आहे.यात सीने जगतात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या हस्तींना गोमचिम गौरव पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे.
यंदाच्या विशेष सोहळ्याची अधिक माहिती देताना शेट्ये म्हणाले,गोमचिम गौरव सोहळ्याचे साक्षीदार होणे ही एक अनोखी पर्वणी असणार आहे.अमेय वाघ आणि पुष्कराज चिरपुटकर हे सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.शशिकांत केरकर,संतोष पवार,पंढरीनाथ कांबळे,रमेश वाणी,किशोरी आंबीये,कमलाकर सातपुते यांचे धमाकेदार सादरीकरण उपस्थित प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणार आहेत.
मानसी नाईक, पुष्कर जोग,संस्कृती बालगुडे, आशीष पाटील, पूजा सावंत आणि शुभंकर तावडे यांची दिलखेचक नृत्ये प्रेक्षकांना बसल्या जागी ताल धरायला लावणार असेच आहेत,असा दावा शेट्ये यांनी केला आहे.
फक्त मराठी आणि विन्सन वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या गोमचिम गौरव सोहळ्यात आठ सीने व्यक्तिमत्वांना विशेष पुरस्कार देऊन गौरवीले जाणार आहे.बॉलीवुडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई, कृतज्ञता पुरस्कार जाहिर झालेल्या सुमित्रा भावे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या खास उपस्थितीत उद्धाटन सोहळा पार पडणार आहे.उद्धाटन सोहळ्या नंतर उद्धाटनाचा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे.
गोमचिम गौरव सोहळा सर्व गोमचिम प्रतिनिधींसाठी खुला आहे.सोमवार पासून पणजी, मडगाव,वास्को,फोंडा आणि म्हापसा येथे प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे शेट्ये म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here