सिंधुदुर्ग-चिपळूण कोर्टामधून गुहागर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कारच्या गुन्हयातील मुख्य आरोपीला घेऊन येत असताना गुहागर चिपळूण मार्गावरील चिखली येथे आरोपीने पोलिसांना तुरी देत जंगलात पळ काढल्याने मोठी खळबळ उडाली होती. हा सगळा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला. अखेर सहा तासांच्या युद्धपातळीवर घेतलेल्या शोध मोहिमेत गुहागर पोलीसांना यश आले आहे. चिपळूण गुहागर मार्गांवरील चिखली गावाच्या दरम्यान जंगलात पळाला होता,गुहागर पोलिसांचा जंगलात तपास करत होते तर चिपळूण ला जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांची नाका बंदीही करण्यात आली होती.
अखेर सहा तासानंतर ग्रामस्थांच्या साहाय्याने चिखली गावातचं हा मोठया गुन्हयातील संशयित आरोपी सापडला आहे. शुक्रवारी रात्री 11 वा.च्या सुमारास त्याला पुन्हा जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून यात चिखली ग्रामस्थांचा मोठा सहभाग आहे. यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे पॉस्को प्रकरणातील या आरोपीला गुहागर पोलीस ठाण्यातील पोलीस दुचाकीवरून आणत होते अशी माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. गुहागर पोलीस चिखली येथील परिसरामध्ये त्याचा शोध घेत होते.
अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या एका तक्रारीवरून निगुंडळ येथील शिव नारायण साळवी हा संशयित आरोपी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये अटक होता. त्याला आज चिपळूण न्यायालयामध्ये हजर करण्याकरता गुहागर मधील पोलीस दुचाकी वरून घेऊन गेले होते. चिपळूण वरून पुन्हा परत आणत असताना चिखली स्टॉपच्या दरम्याने आपल्याला लघुशंकेसाठी आरोपीने थांबवण्यास सांगितले. त्याप्रमाणे पोलीस यांनी दुचाकी थांबवली. मात्र या आरोपीने तेथून पलायन केले आहे. चिखली येथे जवळच दाट जंगल असल्याने त्यांनी त्या जंगलात पलायन केले आहे. या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली असून सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध घेत सुरु होता यात यश आले आहे.