‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकात आरोग्य पथके तैनात

0
211

 

कोरोनाचा प्रसार लक्षात घेता रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून कोकोण रेल्वे मार्गावरील काही प्रमुख स्थानकांवर आरोग्य पथके तैनात केली आहेत. रत्नागिरी रेल्वे स्थानकात प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. या रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. संशयित वाटणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी केली जात असून रेल्वे प्रशासनाने कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता स्वच्छता मोहीम देखील हाती घेतली आहे. रत्नागिरीसह चिपळूण, खेड रेल्वे स्थानकांबरोबरच जिल्ह्याच्या सर्व सिमांवर आरोग्य पथके तैनात करण्यात आली आहेत. कोरोनाच्या धास्तीने प्रवासीदेखील जागरुक झाल्याचे चित्र पहायला मिळत असून प्रवासादरम्यान मास्कचा वापर केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here