कोरोनाचा मृत्यूदर कमी करणे व रिकव्हरी रेट वाढविण्यावर भर द्या  – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

0
232

 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने लक्ष पुरवावे, तसेच रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे अशा सुचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी कोविड – 19 परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यानी या सूचना केल्या.

याबैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील मृत्यूदर हा राज्याच्या मृत्यू दरापेक्षा जास्त असल्याचे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या की, सावंतवाडी तालुक्यात मृत्यूदर जास्त आहे. त्याची कारणे शोधून त्याचा अभ्यास करावा, सावंतवाडीतील मृत्यूदर कमी करण्यासाठी तालुका स्तरावरील अधिकारी व यंत्रणांनी नियोजन करून काम करावे, जिल्ह्याचा रिकव्हरी रेटही वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणांनी काम करावे. तसेच ज्या रुग्णांना घरी सोडले जात आहे. त्यांचा डाटा दररोज अपडेट करावा. कोविड केअर सेंटर येथे किमान कर्मचारी वर्ग उपलब्ध करून द्यावा. नव्या कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांनी सतर्क रहावे. जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या सर्व नागरिकांची माहिती त्यामध्ये स्थानिक व पर्यटक अशा दोन्ही प्रकारच्या लोकांची माहिती संबंधित यंत्रणांनी गोळा करावी. त्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here