केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत ढोल ताशे, लेझिम पथकाने खारेपाटण दणाणले भाजपा कार्यकर्ताचा अमाप उत्साह; भाजपाच्या उंच झेंड्यानी वातावरण भारलेले कोकणात सुक्ष्म लघु व मध्यम या माझ्या खात्याच्या साह्याने कोकणात उद्योग वाढले तर त्याचे मला समाधान वाटेल

0
204

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर ना. नारायण राणे यांचे मोठ्या संख्येने उपस्थित महिलां, तरुण व जेष्ठ नागरिकांनी स्वागत केले. या स्वागत समारंभात अनेकांना ना. नारायण राणे यांचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले तेव्हाच्या आठवणी ताज्या झाल्या. तोच दिमाख तीच उत्स्फूर्तपणा आज दिसत होता. विविध सामाजिक संघटना पदाधिकारी आदिनी त्यांचे स्वागत केले. महिलांनी औषण केले. ना. नारायण राणे म्हणाले, कोकणातील जनतेने मला प्रेम दिले आहे.. मी केंद्रात मंत्री झाल्याने कोकणच्या विकास करत असताना माझ्या विभागात मार्फत योजनांतून अनेक उद्योजक निर्माण झाले तर मला त्याचा आनंद आणि समाधान मिळेल. यावेळी अनेक योजनांची माहिती ना. राणे यांनी दिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here