सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने कुडाळ येथे इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ निषेध रॅली काढण्यात आली दरम्यान कुडाळ पोलिसांनी काँग्रेसच्या १५ ते १६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या वाढलेल्या किंमती विरोधात कुडाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ग्रामीण रुग्णालयात पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.
या रॅलीला कुडाळ पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय येथे अडवून काँग्रेसच्या १५ ते १६ पदाधिकारी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. या रॅलीमध्ये केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी तसेच प्रांतीकचे विकास सावंत विलास गावडे, साईनाथ चव्हाण, सुगंधा साटम, जिल्हा बँकेचे संचालक विद्याप्रसाद बांदेकर शेखर जोशी, उल्हास शिरसाट आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.