कसणाऱ्यालाही मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण, पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती, खारेपाटण तलाठ्यावर दिले कारवाईचे आदेश शेतकरी माहिती देतील तसेच पंचनामे करण्याचे दिले आदेश

0
323

सिंधुदुर्ग – जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसंग्रस्थ शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. खारेपाटण, कासार्डे, माणगाव खोरे आधी भागात त्यांनी भेट दिली आणि शेतकऱ्यांच्या बांधावरच शासकीय पंचनाम्याच्या प्रक्रियेची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खारेपाटण गावात मंदिरात बसून शेतीचे पंचनामे करणाऱ्या महसूल यंत्रणेचा पंचनामा करतानाच येथील तलाठी रमाकांत डगरे यांच्यावर कारवाई करून तात्काळ बदलीचे आदेश प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले आहेत.जिल्ह्यात २५ टक्के क्षेत्र बाधित झालेलं आहे. वेळ पडल्यास निकष बदलून शासन मदत जाहीर केली जाईल. नव्या बदललेल्या निकषाचा परिणाम कोकणातील शेतकऱ्यांवर होत असेल तर मुख्यमंत्र्यांना माहिती देऊ. तसेच कसणाऱ्यालाहि मदत मिळाली पाहिजे हे सरकारचे धोरण असल्याचे यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने येथील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी पूर आल्यामुळे भातशेतीचे अधिकच नुकसान झाले आहे.यामध्ये काही शेतकऱ्यांचे भात हे पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काहिचे भात पावसाच्या पाण्याने कुजून गेले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटणसह जिल्ह्यातील भात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना नेते संदेश पारकर,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कणकवली तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत, आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करताना ज्या काही त्रुटी अधिकाऱ्यांना येत आहेत, त्या दुर करण्याच्या सूचना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर उपस्थित राहून अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कोकणात बऱ्याच ठिकाणी दुसऱ्याच्या मालकीचे शेत कसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. याबाबत आपण कृषी मंत्री ,महसूल मंत्री व खुद्द मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकरी बांधवाना देखील नुकसान भरपाई मिळण्यासठी प्रयत्न करणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या भात शेतीची झालेल्या नुकसानीची भरपाई ही योग्य वेळी दिली जाईल असे देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांगत असल्याचे देखील पालकमंत्री सामंत यांनी शेतकऱ्यांना सांगितले. निसर्ग चक्रीवादळात पूर्वीचे निकष बदलून मदत दिलेली आहे. शेती नुकसानीच्या बाबतीतही वेळ पडल्यास शासन असा निर्णय घेईल असेही ते यावेळी म्हणाले. जमीन मालकासोबतच ती जमीन कसत असलेल्या शेतकऱ्याला देखील मदत मिळाली पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.

दरम्यान आज पालकमंत्री उदय सामंत यांनी खारेपाटण येथे शेताच्या बांधवरच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.यावेळी मंदिरात बसून कागदी पंचनामे करणाऱ्या महसुली व कृषी कर्मचारी यांच्यावर ताशेरे ओढत नाराजी व्यक्ती केली. तर अधिकाऱ्यांनी जबाबदारीने प्रत्यक्ष शेतावर जाऊनच पंचनामे करावेत. यामध्ये काम चुकारपणा करणाऱ्या कर्मचऱ्यावर कडक कारवाही करण्यात येईल.अशा सक्त सूचना देखील वरीष्ट अधिकाऱ्यांसह सर्व प्रशासकीय यंत्रणेला पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिल्या.” यावेळी येथील तलाठी रमाकांत डगरे यांच्या तक्रारीचाच पाढा शेतकऱ्यांनी वाचला. तसेच पालकमंत्री सामंत यांच्या प्रश्नांना तलाठी डगरे उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे या तलाठ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here