सिंधुदुर्ग – “कोरोनाच्या संकटात जेव्हा कोविडची लस उपलब्ध नव्हती तेव्हा आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोनायोद्धे बनून लढणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांना योग मार्गदर्शन करण्याची आज मला संधी लाभली हे माझे भाग्यच आहे. कोरोना संकटात आजपर्यंत ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावले त्या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मात्र हे अत्यंत महत्वाचे कर्तव्य बजावताना सर्वांनी स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. आपले आरोग्य निरोगी रहावे यासाठी एकमेव उत्तम पर्याय म्हणजे योग प्राणायाम आहे. हा योग दिन एक दिवस साजरा न करता तो प्रत्येकाने दैनंदीन आचरणात आणुन रोजच साजरा करायला हवा,” असे आवाहन योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे पळसुले यांनी आज कणकवली पोलिस स्टेशन मधील आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योग मार्गदर्शन शिबिरावेळी केले.
यावेळी पोलीस निरीक्षक अजमुद्दिन मुल्ला, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, विनायक चव्हाण, पोलीस हवालदार मंगेश बावदाने, राजेंद्र नानचे, संदेश आबिटकर, वैभव कोळी, मनोज गुरव, रुपेश गुरव, किरण मेथे, चंद्रकांत माने, महिला पोलीस दीपा माने आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आरोग्याविषयी बहुमूल्य असे योग मार्गदर्शन केल्याबद्दल सर्वांनी योगशिक्षिका सौ.श्वेता गावडे यांचे आभार मानले.