कणकवली मतदार संघात नितेश राणे यांचा पराभव करून त्यांना शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देणार आमदार वैभव नाईक यांनी दिले प्रतिआव्हान

0
205

 

सिंधुदुर्ग – भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आव्हान दिले आहे. नितेश राणे यांनी काल आमदार नाईक यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना आमदार नाईक म्हणाले आता कणकवली मतदारसंघात, नितेश राणे यांचा पराभव करून शिवसेना ही काय चीज आहे; हे त्यांना आम्ही दाखवून देऊ. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात चांगलेच राजकीय वातावरण तापले असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी आता झडू लागल्या आहेत.

आमदार राणेंना आमदार नाईकांचे आव्हान

भाजप आमदार नितेश राणे यांचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ, असे प्रति आव्हान शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदावर भाजपचा अध्यक्ष आरुढ झाल्यावर नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वैभव नाईक हे आमच्याशी आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणाऱ्याला दहा जन्म घ्यावे लागतील असं आव्हान नितेश राणे यांनी शिवसेनेला दिलं होतं. त्यांचं आव्हान स्वीकारत नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ, असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केलाय.

नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करु

नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ. नारायण राणेंचं आव्हान आम्ही कधीच संपवलं. वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देऊन 2014 च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला तर गेल्या निवडणूकीत माझ्या मुळेच नारायण राणेंनी पळ काढला, अशी जोरदार टीका वैभव नाईक यांनी राणेंवर केली.

काय म्हणाले होते नितेश राणे ?

सिंधुदुर्ग जिल्हा राणे साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभा असून आम्हाला आव्हान देणारा धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील, असा थेट इशारा नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला होता. तसंच जिल्ह्यामधे वैभव नाईक हे आम्हाला आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालयं अशी टीका करत नितेश राणे यांनी वैभव नाईक यांना आव्हान दिलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here