कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बैठका, चर्चांनंतर शिवसेना आता सत्तास्थापनेच्या जवळ आलेली असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक शिवसेनेने भाजपसोबत लढली आणि निकालानंतर मात्र भाजपसोबत काडीमोड घेऊन विरोधी आघाडीसोबत सत्ता स्थापन करत आहे. यावरून औरंगाबादकरांनी उद्धव ठाकरे आणि औरंगाबादमधील शिवसेनेच्या नेत्यांवर आक्षेप घेतला. तसेच त्यांच्याविरुद्ध बेगमपुरा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.