आर.डी.सामंत कन्सट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपयांची बेनामी ठेकेदारी भाजपा आम.नितेश राणे यांचे माजी खासदार,भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

0
109

सिंधुदुर्ग – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये भ्रष्टमार्गाचा अवलंब केला आहे.

त्यांचा सुरू असलेला गैरकारभार व शासकीय निधीचा गैरवापर याची चौकशी होणे गरजेचे आहे. मे. आर. डी. सामंत या त्यांच्या कन्सट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून करोडो रुपयांची बेनामी ठेकेदारी चालू आहे.

पर्ससीन एलईडी मच्छिमारांकडून हप्ते खोरी चालू आहे.

व्हाईस चॅन्सलर नियुक्त्या गैरमार्गाने केल्या जात आहेत. या सर्वांचे पुरावे आपल्याला सादर केले जातील.

सामंत बंधूंच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन कारवाई होणे गरजेचे आहे. असे पत्र भाजपा आमदार नितेश राणे यांनी माजी खासदार, भाजपा नेते किरीट सोमय्या यांना लिहिले आहे.

आम.नितेश राणे यांनी श्री.सोमय्या यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहेत, आपणाकडून तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये केलेल्या प्रचंड भ्रष्टाचाराची प्रकरणे सद्या बाहेर काढली जात आहेत.

भविष्यात महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार मुक्त होण्याच्या दृष्टीने आपण उघडलेल्या मोहीमेमुळे महाराष्ट्रीय जनतेला निश्चितच अभिमान वाटत आहे.

सद्या कोकणात विशेषतः रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनील परब व उदय सामंत यांनी सत्तेच्या माध्यमातून गैरमार्गाने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यापैकी अनील परब यांची चौकशी आपल्या तक्रारीवरून सुरू आहे.

त्याचप्रमाणे उदय सामंत व त्यांचे पडद्या मागून भ्रष्ट कारभार सांभाळणारे बंधू किरण सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांमधील शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून गैरमार्गाने पैसा जमा करून त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा सपाटा लावला आहे. असेही म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here