सिंधुदुर्ग – भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी आज कणकवली येथे पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या वरून थेट महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष केले. नवाब मलिक यांनी हसीना पारकर यांच्याशी अनधिकृतपणे जमिनीचा व्यवहार केला. या व्यवहारातून मिळालेल्या पैशातून देशात दहशतवादी कारवाया करण्यात आल्या असा थेट आरोप केला.
तसेच लाड यांनी नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीतील सदस्यांवर प्रहार करताना जर आज गांधीजी असते तर व्यतीत झाले असते त्यांनी आपल्या दोन माकडांना डोळ्यांवर हात ठेवायला सांगितले असते असं म्हणाले.जोपर्यंत मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत भाजपा संघर्ष करत राहणार असल्याचे सांगताना त्यांनी ८ तारखेला मुंबईत यासाठी भव्य मोर्चा काढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
लाड पुढे म्हणाले भाजपच्या नेत्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले जात आहेत. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली. त्यानंतर राष्ट्रवादी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चे ,आंदोलने केली. परंतु या गुन्ह्यात ईडीने ९ ठिकाणी धाडी टाकल्या, दाऊदची बहीण हसीना पारकर व अन्य लोकांकडून ही जमीन घेतली, त्याचे जबाब झाले, त्यात मुबंई जमीन व्यवहार ८ हजार २५० रुपये बाजार भाव होता,तरी देखील कागदोपत्री व्यवहार ३० लाख दाखवला गेला. त्यात ३०० कोटीची फसवणूक झाली. ही जमीन परस्पर कुलमुखत्यार दाखवून विकली गेली. मूळ जमीन मालकांना पैसे मिळालेच नाहीत. जमीन विकत घेतली,त्याची चौकशी केली, ३० लाख व्हाईट दाखवला गेला. हा पैसा गेला कुठे ?बॉम्बस्फोट झाला तिथे गेला का?,हैदराबाद मध्ये हल्ला झाला तिथे गेला का?असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत. नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही ,असे महाविकास आघाडी म्हणणं आहे. महाविकास आघाडी सरकार मंत्री नवाब मलिक यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आ.प्रसाद लाड यांनी केला. हा जमीन व्यवहार २००३ मध्ये सुरु झाला,त्यानंतर २००५ मध्ये व्यवहार संपला.त्यावेळी केंद्र व राज्यात कॉग्रेस सरकार होते. बॉम्बस्फोट ६ ठिकाणी झाला त्याला हे पैसे लागले का?दाऊद इब्राहिम ने देशात अनेक कृत्य केली आहेत. त्याला खतपाणी कोण घालत होते? त्यावेळी काँग्रेस आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केला. आमचे देशात सरकार आल्यानंतर आम्ही चौकशी करत आहोत. मंत्र्याने दहशतवादी लोकांकडून जमीन खरेदी केली,त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.