सिंधुदुर्ग – जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे यांच्या फेरविचार याचिकेवर सुनावणी आज पार पडली. सकाळच्या सत्रात नितेश राणे यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली यावेळी त्यांनी आरोपीला आम्ही कोर्टाच्या ताब्यात देत आहोत असे म्हटले. मात्र यानंतर वकिलांसह आमदार नितेश राणे निघून गेलेत. यासंदर्भात सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दुपारच्या सत्रात आक्षेप घेत आरोपी शरण आला असल्याने त्याने कोर्टाच्या अधीन राहणे जरुरीचे असल्याचे मत मांडले. दरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत न्यायालयाने मंगळवारी याबाबत निकाल दिला जाईल असे स्पष्ट केले. तूर्तास नितेश राणे यांना एक दिवसाची सवलत मिळाली आहे.
आमदार नितेश राणे यांच्या अटक पूर्व जामीन अर्जाच्या फेरविचार याचिकेवर जिल्हा न्यायालयात आज सुनावणी झाली दोन्ही पक्षाच्या वतीने यावेळी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये आमदार नितेश राणे यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली यावेळी आम्ही आरोपीला न्यायालयाच्या हवाली करत आहोत असे देखील स्पष्ट केले. मात्र यानंतर दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आमदार नितेश राणे हे आपल्या वकिलांसोबत निघून गेले. या गोष्टीला सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला या संदर्भात बोलताना आमदार नितेश राणे यांचे वकील संदीप मानशिंदे यांनी नितेश राणे यांची ही तांत्रिक सरेंडर होती असे स्पष्ट केले.