सिंधुदुर्ग – जिल्हा नियोजनाच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्यावर मी आक्रमक झालो होतो अशी भूमिका आजच्या बैठकीनंतर खासदार नारायण राणे यांनी मंडळी आहे. तर कोणतीही बाचाबाची झाली नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंती उदय सामंत यांनी दिले आहे. त्यामुळे आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर नेत्यांनी सारवासारव केली असली तरी राणे आणि राऊत एकमेकांना भिडल्याने काही काळ राजकारण चांगलेच तापले होते.
जिल्हा नियोजन बैठकीत खासदार नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती दोडामार्गातील तिलारी धरण डावा कालवा फुटल्याच्या विषया वरून भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी मांडलेल्या भुमिकेला शिवसेनेचे सदस्य बाबूराव धुरी यांनी आकशेप घेतल्यामुळे वाद झाला होता. या वादावर आता खासदार नारायण यांनी भुमिका मांडली आहे जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्यावर मी आक्रमक होतो. गेली वर्षभर अपेक्षीत फंड आला नाही. जिल्ह्याचा विकास ठप्प झालाय. या गोष्टी आम्ही आज मांडल्या जर विकासाला निधी येत नसेल, खर्च होत नसेल तर जिल्हा नियोजनचा उपयोग काय हा आमचा प्रश्न आहे? पालकमंत्र्यानी फंड आणावा आणि खर्च करावा ही आपली भुमिका असल्याचा आक्रमक पवित्रा राणेंनी घेतला आहे.
तर पालकमंत्री उदय सामंत यांनी बैठकीत राणे आणि राऊत यांच्यात कोणतीही बाचाबाची झाली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
नारायण राणे खासदार म्हणून त्यांची भुमिका मांडत होते तर विनायक राऊत आपली भुमिका मांडत होते आजच्या बैठकीत थोडीफार तात्वीक मतभेद नक्की झाले माञ कुठेही वादावादी झाली नाही उलट खेळी मेळीच्या वातावरण बैठक पार पडली असल्याचं स्पष्टीकरण पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलं आहे.



