आंबोलीच्या मुख्य धबधब्यावरून कोसळला भलामोठा दगड, वाहतूक नसल्याने अनर्थ टळला

0
170

सिंधुदुर्ग – गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास आंबोली मुख्य धबधब्याजवळ एक भलामोठा दगड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला स्टॉलच्या अगदी समोर येऊन रस्त्यावर पडला. हा दगड प्रचंड मोठा असून याठिकाणी सुदैवाने पर्यटन चालू नसल्याने मोठी जीवित हानी टळली.

जाणकारांच्या मते वनविभागाने धबधब्यांच्या वरती बांधलेल्या बंधाऱ्यांमुळे अशा प्रकारचे दगड किंवा छोट्या-मोठ्या दरडीखाली येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धबधब्यांवरील बंधारे लवकरात लवकर फोडून काढावेत, अशी मागणी जाणकार व आंबोलीतील ग्रामस्थ करत आहेत. याबाबत अनुभवी बांधकाम मजूर शिवा गावडे यांनी सांगितले होते, की हे बंधारे बांधल्याने धबधब्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळण्याची शक्यता आहे आणि आता तसेच होत आहे. काही वर्षांपूर्वी असाच एक भलामोठा दगड एका कार वर येऊन कोसळला होता. काही वेळी सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. आताही तेवढाच प्रचंड मोठा दगड या ठिकाणी येऊन स्टॉलच्या अगदी तोंडाजवळ येऊन थांबला. जर धबधब्यावरील पर्यटन सुरू असते, तर मोठा अपघात घडला असता व मोठी जीवित हानीही झाली असती. धबधबा जवळील दरडीची पाहणी करून याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची गरज असून तसे न केल्यास भविष्यात अशा दरडी कोसळतच राहतील व मोठी जीवित हानीही होईल, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here