31 C
Panjim
Saturday, April 1, 2023

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबोली क्षेत्रात शिस्टुरा हिरण्यकेशी जैविक विविधता स्थळ घोषित अधिसुचना आज महसुल व वन विभागाने केली प्रसिद्ध

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदूर्ग – जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली हिरण्यकेशी येथील २.११ हे.आर क्षेत्रामध्ये “शिस्टुरा हिरण्यकेशी”  अर्थात देवाचा मासा ही दुर्मिळ प्रजाती आढळून येत असल्याने या क्षेत्रास आता जैविक विविधता वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. यासंबंधीची अधिसुचना आज महसुल व वन विभागाने प्रसिद्ध केली.

शिस्टुरा हिरण्यकेशीची या नव्या वारसा स्थळाची पडली भर

यापूर्वी शासनाने गडचिरोलीतील ग्लोरी अल्लापल्ली, जळगावचे लांडोरखोरी, पुण्याचे गणेशखिंड, सिंधुदूर्गातील बांबर्डे येथील मायरिस्टीका स्वम्प्स या क्षेत्रांना जैविक विविधता वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे. आता शिस्टुरा हिरण्यकेशीची यात भर पडली आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी  (देवाचा मासा) या प्रजातीचे वैशिष्ट्य म्हणजे ही प्रजाती दुर्मिळ असून ती मौजे आंबोली गावातील हिरण्यकेशी या गावाच्या हिरण्यकेशी नदीच्या उगम स्थानाजवळ आढळून येते.

दुर्मिळ माशाच्या संवर्धनासाठी ही घोषणा ठरणार महत्त्वाची

या क्षेत्रात पुरातन असे हिरण्यकेशी अर्थात महादेव मंदिर व कुंड आहे. कुंडातील व हिरण्यकेशी नदीच्या पात्रात शिस्टुरा हिरण्यकेशी प्रजातीच्या दुर्मिळ माशांचा अधिवास आहे या क्षेत्रात गवे, हरीण, बिबट, अस्वल, शेकरू, माकड, वानर, मुंगूस, साळींदर, खवले मांजर, भेकर आदी वन्यजीव आढळून येतात. तसेच साग, आंबा, किंजळ, ऐन, जांभा, उंबर, जांभूळ, अंजन, फणस अशा वृक्षप्रजाती, झाडे, झुडपे आणि वेलींचे ही याभागात अस्तित्त्व आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी ही दुर्मिळ माशांची प्रजाती मासेमारीमुळे धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे या प्रजातीचे संरक्षण आणि संवर्धन होण्याच्यादृष्टीने आजचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मुलाने घेतला होता संशोधनात सहभाग

वन्यजीव संशोधकांनी ॲक्वा या आंतरराष्ट्रीय मासिकात या दुर्मिळ प्रजातीचा अभ्यास सादर केला आहे. या संशोधनामुळे सह्याद्री विशेष करून आंबोली परिसरातील जैवविविधता आणि त्याचे महत्व वाढणार आहे जनसामान्यांमध्ये जैवविविधता संवर्धनाबाबत जनजागृती होणे, त्यातून देवाचा मासा  या दुर्मिळ प्रजातीचे जतन आणि संवर्धन होण्यास आता मदत होणार असून अशाप्रकारे हेरिटेजचा दर्जा मिळणारे हे देशातील पहिले क्षेत्र ठरले आहे. शिस्टुरा हिरण्यकेशी माशाच्या नव्या प्रजातीचा शोध डॉ. प्रविणराज जयसिन्हा, तेजस ठाकरे, शंकर बालसुब्रमण्यम यांनी केला. या क्षेत्राला जैविक विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित व्हावे अशी ग्रामस्थांचीही मागणी होती.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles