सिंधुदुर्ग भाजपा ने केले ठाकरे सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन.!

0
63

 

सिंधुदुर्ग – कोरोनाच्या काळात राज्यात ठाकरे सरकार सर्वच स्थरावर अपयशी ठरल्याने “आंगण ते रणांगण”हे सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा च्या वतीने आंदोलन करण्यात आले.सर्वसामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष करणार्‍या राज्य शासनाचा निषेध असो..,बचाव बचाव महाराष्ट्र बचाव…,ठाकरे सरकार हाय हाय,राष्ट्रवादी सरकार हाय हाय…,काँग्रेस सरकार हाय हाय..!चलेजाव चलेजाव पालकमंत्री चलेजाव..! आशा घोषणा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आम.प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जिल्हा कार्यलय येथे हे आंदोलन झाले.
यावेळी तालुका अध्यक्ष राजन चिके, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, राजश्री धुमाळे,प्रज्ञा ढवण, गीता कामत, सौ.कर्पे,नगरसेवक गणेश हर्णे,विराज भोसले,शिशिर परूळेकर,पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री,बंड्या सावंत,समर्थ राणे, आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here